सिंधुदुर्ग! कुडाळमध्ये कॉलेज युवतीची प्रेमप्रकरणातून क्रूरपणे हत्या…

सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यातील वर्दे-कडावल मुख्य रस्त्याजवळील एका ओढ्याच्या बाजूला दामिनी किरण पालव (वय २३, रा. वर्दे खालची पालववाडी) या महाविद्यालयीन युवतीचा तीक्ष्ण हत्याराने वार करून अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. संशयित आरोपी संशयित साहिल विश्राम धुरी याला पोलिसांनी मध्यरात्री चार वाजता अटक केली आहे. हा खून एकतर्फी प्रेमसंबंध अथवा प्रेमप्रकरणातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

दामिनी ही तालुक्यातील एका नामांकित कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करत होती. शनिवारी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास ती कॉलेजच्या गणवेशातच गावात परतली होती. वर्दे-कडावल रस्त्यावरून जात असताना ओढ्याच्या बाजूला सायंकाळी पावणेसहा ते सहाच्या दरम्यान तिच्यावर प्राणघातक हल्ला चढवण्यात आला. हल्लेखोराने तिच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करून तिला रक्तबंबाळ अवस्थेत तिथेच सोडून पळ काढला.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

घटनेच्या वेळी मुख्य रस्त्यावर मोबाईलवर बोलत असलेल्या एका स्थानिक तरुणाला ओढ्याच्या दिशेने झटापटीचा आणि ओरडण्याचा आवाज आला. त्याने तातडीने रस्त्यावरून जाणाऱ्या इतर ग्रामस्थांना याची कल्पना दिली. ग्रामस्थ आवाजाच्या दिशेने धावले असता दामिनी गंभीर जखमी आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. यानंतर वर्देचे सरपंच पालव आणि पोलिस पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

दरम्यान, घटनेनंतर घटनास्थळावरून काळा शर्ट घातलेला एक तरुण दुचाकीवरून वेगाने पसार होताना काहींनी पाहिले होते. पोलिसांनी तातडीने परिसराची नाकाबंदी करून तपास चक्रे वेगाने फिरवली. संशयित साहिल धुरी हा मृत युवतीच्या महाविद्यालयातच शिकत असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी कसून शोध घेत मध्यरात्री चारच्या सुमारास साहिलला त्याच्या घरातून बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचा पुढील तपास सिंधुदुर्ग पोलिस करत आहेत.

कोल्हापूर हादरलं! मंदिर परिसरात स्पीकरचा आवाज अन् मुलीचा चिरला गळा…

सोलापूर हादरलं! प्रेमप्रकरणातून युवकाला झाडाला बांधून बेदम मारहाण, अखेर मृत्यू…

नांदेड! प्रेमप्रकरणातून युवकाची अमानुष मारहाण करून हत्या…

प्रेमप्रकरणातून दुहेरी हत्याकांड! कारागृहातून सुटला अन् प्रेयसीला भेटायला गेला…

महिला पोलिसाची प्रेमप्रकरणातून हत्या; नवऱ्याने सांगितले की…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!