सासऱ्याने केला सुनेवर बलात्कार; तक्रार दाखल…

जयपूर (राजस्थान): सासऱ्याने सुनेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चुरू जिल्ह्यात घडली आहे. सासऱ्याने दिलेल्या धमक्यांमुळे गप्प राहिल्याचे सुनेने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

सासऱ्याने दोन वेळा बलात्कार केल्याचा आरोप सुनेने केला आहे. घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिते महिलेचे (वय ३०) लग्न 2017मध्ये दूधवाखारा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातल्या एका गावात झाले आहे. लग्नानंतर हुंड्यासाठी तिला त्रास देऊ लागल्यानंतर तिने तिच्या वडिलांकडून 10 लाख रुपये घेऊन त्यांना दिले.

पीडित महिलेचा सासरा आयएसीमध्ये काम करत आहे. पण, नेहमीच वाईट नजर असायची. 2020 साली सासऱ्याने तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार केला. ऑक्टोबर 2023 मध्ये तिचा सासरा जेव्हा सुट्टीसाठी घरी परतला होता, तेव्हा त्याने तिला गुंगीच्या पदार्थाचा वास देऊन तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. पुढे तिने सगळा प्रकार तिच्या आईला सांगितला व पोलिसांत तक्रारही केली. महिला ठाण्याच्या पोलिसांनी आरोपीच्या विरुद्ध आयपीसीच्या 498, 406, 323, 376 2 एन, 506, 143 या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सूनेचे सासऱ्याशी होते अनैतिक संबंध अन् एक दिवस…

युवतीवर पाच जणांकडून सामूहिक बलात्कार; व्हिडिओ व्हायरल…

सुनेला भेटण्यासाठी तिचा प्रियकर उघडपणे घरी येतो अन्…

हनिमूनच्या रात्रीच पत्नीने केली नवरदेवाला बेदम मारहाण…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!