नवविवाहितेने हाताच्या तळव्यावर कारण लिहून केली आत्महत्या…

मुंबई : नालासोपारा परिसरात हुंड्याच्या छळला कंटाळून एका नवविवाहितेने गळफास घेऊन आत्मत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी तिने हाताच्या तळव्यावर हुंड्यासाठी छळ होत असल्याचे लिहून ठेवले होते. या प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी तिच्या पती आणि सासर्‍याला अटक केली आहे.

मुंबईच्या सातरस्ता येथे राहणार्‍या संगिता कनोजिया (वय 22) या युवतीचे गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये नालासोपाऱ्यात राहणाऱ्या नितीशकुमार कनोजिया याच्या सोबत लग्न झाले होते. तिच्या लग्नात तिच्या आईवडिलांनी भरपूर हुंडा दिला होता. पण तरीही अधिक रकमेसाठी तिचा पती, सासरे, सासू आणि नणंद तिचा हुंड्यासाठी शारिरीक आणि मानसिक छळ करत होते. या छळाला कंटाळून तिने शनिवारी (ता. 14) गळफास घेऊन आत्महत्या केली. हुंड्यासाठी दररोज माझा छळा केला जात होता, अपमानित केले जात होते असे तिने हाताच्या तळव्यावर आत्महत्येपूर्वी लिहून ठेवले आहे.

या प्रकरणी संगिताचे वडील मुन्नीलाल कनोजिया यांनी नालासोपारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ‘माझ्या मुलीला मारहाण केली जायची, तिला उपाशी ठेवले जात होते’,असे तिच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून नालासोपारा पोलिसांनी संगिताचा पती नितेशकुमार कनोजिया, सासरा शिवसेवक कनोजिया, सासू आशा कनोजिया आणि नणंद माला कनोजिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तिच्या नवऱ्याला आणि सासऱ्याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

पुणे जिल्ह्यात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीची आत्महत्या…

पोलिसकाकाची घराच्या अंगणात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या…

युवतीची बलात्कारानंतर आत्महत्या; फरार संशयिताचा आढळला मृतदेह…

दुसऱ्या विवाहाचे फोटो ठेवले स्टेटसला, पहिल्या डॉक्टर पत्नीची आत्महत्या…

माझ्या बायकोचं अफेअर आहे म्हणत केली आत्महत्या…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!