युवकाच्या स्वप्नात यायचा सतत मृतदेह अन् सांगायचा…

रत्नागिरीः एका युवकाच्या स्वप्नात सतत मृत्यू झालेली व्यक्ती येते आणि मदतीचे आवाहन करते. पाहिलेले स्वप्न हा युवक पोलिसांना सांगतो. पोलिस ही त्याच्या जबाबावर गुन्हा नोंदवून तपासाला सुरवात करतात. पोलिसांना घटनास्थळी गेल्यावर खरोखरच एक कुजलेला मृतदेह आढळून येतो आणि पोलिसही चक्रावून जातात. पोलिस या प्रकरणाचा तपास सुरू करत आहेत. मात्र, समोर आलेल्या या घटनेची एकच चर्चा सुरू झाली असून विविध शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

रत्नागिरीतील खेड तालुक्यातील भोस्ते घाटात एका पुरुषाचा सापळा आणि कवटी तसेच झाडाच्या फांदीवरती लोंबकळणारी दोरी बुधवारी संध्याकाळी सापडल्याने खळबळ उडाली होती. मात्र, आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील एका युवकाला या ठिकाणी मृतदेह असल्याचे स्वप्न पडले, त्याने ते खेड पोलिसाना सांगितले. त्यावरुन हा रहस्यमय सापळा आणि कवटीचे गूढ उकलले आहे.

पोलिसांच्या गुन्ह्या नुसार, 17 सप्टेंबर 2024 रोजी योगेश पिंपळ आर्या (वय 30) ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील आजगांव येथे राहणारी व्यक्ती खेड पोलिस स्थानकात दाखल झाली. त्याने पोलिसांना सांगितले की, ‘मला वारंवार स्वप्न पडत असून, खेड रेल्वे स्टेशनसमोर एका डोंगरात पुरुषाचे प्रेत असून तो माझ्या स्वप्नात येऊन आम्हाला मदत करा असे सांगत आहे.’

योगेश आर्या याच्या बोलण्यावर पोलिसांनी विश्वास ठेवत या भागाची पाहणी केली. त्यावेळी भोस्ते घाटातील जंगलात एका आंब्याच्या झाडाजवळ कुजल्याचा वास येत होता. पोलिसांनी जवळ पाहिले असता आंब्याच्या झाडाच्या फांदीला काळ्या रंगाची वायर आणि प्लास्टिकच्या पट्टया बांधून त्याला टॉवेलने बांधून गळफास असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचे प्रेत खाली पडलेले दिसले. त्याच्या अंगात राखाडी रंगाचे जॅकेट, राखाडी रंगाची पँट आणि या पोषाखाच्या आत मानवी हाडे असल्याचे दिसून आले. या मृतदेहाच्या पायाजवळच काळ्या रंगाची आदिदास लिहिलेली सॅक सापडली. तर मृतदेहापासून 5 फुटावर एक कवटी सापडली. मृतदेहाच्या दोन्ही ढोपराजवळ एआयआर कंपनीचे काळ्या रंगाचे बूट सापडले. मात्र या व्यतिरिक्त जवळच्या सॅकमधे पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवणारे कुठलेच पुरावे सापडले नाही. त्यामुळे ही आत्महत्या की घातपात याचा तपास खेड पोलिस करत आहेत.

दरम्यान, संबंधित मृतदेहाची अवस्था पाहता तो बरेच दिवसाचा असावा असे स्पष्ट होते. थेट मृतदेहच सावंतवाडीतील एका युवकाला आपल्या मृत्यूची बातमी स्वप्नात येऊन देतो आणि त्यावरून स्थानिक पोलिस मृतदेह शोधतात या गोष्टीवरून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पण, या प्रकरणाचे गूढ पोलिसांना उलगडावे लागणार आहे.

पुणे शहरात कामाच्या ताणामुळे युवतीचा मृत्यू; अजित पवार म्हणाले…

पुणे जिल्ह्यातील दोन मैत्रिणी मित्राच्या खोलीवर गेल्या अन् दारु पाजून अत्याचार…

बदलापूर प्रकरण! अक्षय शिंदे याची दुसरी पत्नीही आली समोर: म्हणाली लिंगपिसाट…

बिहारमधील शिक्षकाने पुण्यात येऊन चिरला पत्नीच्या प्रियकराचा गळा अन्…

अभिनेत्री प्रकरण! तीन IPS अधिकाऱ्यांचे निलंबन…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!