पत्नीची संशयावरून केली हत्या अन् शीर घेऊन रस्त्यावर लागला नाचू…

लखनौ (उत्तर प्रदेश): एका नवऱ्याने संशयावरून पत्नीची हत्या केली आणि शीर कापून रस्त्यावर फिरत होता. संबंधित प्रकार पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. याबाबतची माहिती पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.

उत्तर प्रदेशच्या फतेहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बसारा गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी असलेल्या पतीचे नाव अनिल असे आहे. अनिल याला पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. दोघांमध्ये अनेकदा भांडण होत होते. दोघांमध्ये झालेल्या वादामध्ये त्याने आपल्या पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केली. त्याने थेट पत्नीचे शीर धडा वेगळे केले. पत्नीचे शीर घेऊन पोलीस ठाण्याच्या दिशेने निघाला होता. भयभीत झालेल्या नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अनिलला अटक केली. तसेच शीर आपल्या ताब्यात घेतले. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

दरम्यान, आरोपी रस्त्यावर पत्नीचे शीर घेऊन फिरत असताना अनेक ठिकाणी तो बसला होता. शिवाय, पत्नीचे शीर घेऊन नाचत देखील होता. हे दृश्य पाहून अनेकांच्या मनात धडकी बसली. अनिलला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी रस्त्यावरच महिलेची अंत्ययात्रा थांबवली अन् पुढे…

विद्यार्थिनीचे अंघोळ करतानाचे फोटो काढणाऱ्या आरोपीची आत्महत्या…

पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशय अन् एक दिवस…

पत्नी पाचव्यांदा लग्न करत समजल्यावर चौथ्या पतीने उचलले मोठे पाऊल…

पुणे शहरात पत्नीचा छातीत जोरात बुक्क्या मारून केला खून…

पत्नीला स्टीलच्या झाऱ्याने मारहाण केल्याने मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!