
नर्सला Kiss करताना दिसला नवरा अन् डॉक्टर महिलेने उचलले मोठे पाऊल…
चंदीगड (पंजाब): पंजाबच्या जालंधर जिल्ह्यात सरकारी डॉक्टर मिनाक्षीने आत्महत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. CCTV फुटेजमध्ये पती नर्सला Kiss करताना दिसल्यानंतर मिनाक्षीने आत्महत्येचे पाऊल उचलले आहे, असे मिनाक्षीच्या माहेरच्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
डॉक्टर मिनाक्षी सूद हिचे पती पियुष सूद देखील डॉक्टर आहेत. पियुष जालंधरच्या नॅशनल आय हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे. मिनाक्षीच्या वडिलांनी म्हटले आहे की, ऑक्टोबर 2018मध्ये दोघांचे लग्न झाले आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. लग्नानंतर मिनाक्षीच्या नवऱ्याने थार घेतली. याचे हफ्ते माझी मुलगी तिच्या पगारातून भरत होती. एवढंच नव्हे तर पियुषने मुलीच्या नावावर अडीच कोटीचं लोन देखील घेतले आहे. जावयाचे रुग्णालयात काम करणाऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. याचा संशय आल्याने, त्यांच्या मुलीने रुग्णालयाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, ज्यातून डॉ. पियुषचे त्या महिलेसोबतचे संबंध सिद्ध झाले. हे फुटेज पोलिसांनाही देण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये डॉ. पियुष नर्सचे चुंबन घेताना दिसत होते.’
View this post on Instagram
वडिलांनी सांगितले की, मुलगी मारहाणीला कंटाळून डॉ. पियुषपासून वेगळी राहू लागली. ती जुलै 2025 पासून वेगळी राहत होती. या महिन्यात ती स्वतःचे घर विकत घेण्याचा विचार करत होती. काही दिवसांपूर्वी जेव्हा ती घर खरेदी करण्यासाठी बँकेत गेली, तेव्हा तिला समजले की त्यांच्या नावावर अडीच कोटी रुपयांचे कर्ज आहे. कागदपत्रांवर तिची सहीसुद्धा नव्हती. आपल्याला नवऱ्याने मानसिक, शारीरिक आणि आर्थिक बाबींवर फसवल्याची भावना डॉक्टर मिनाक्षीमध्ये निर्माण झाली होती. त्यांच्या मुलीला आता घटस्फोट हवा होता. त्यांनी न्यायालयीन प्रक्रिया देखील सुरु केली होती. त्यामुळे तिने थोडावेळ तरी थांबायला हवं होतं. दरम्यान, कर्जाचे प्रकरण उघडकीस आले, ज्यामुळे मुलगी अस्वस्थ झाली. ती मुलगी कपूरथला येथील एका सरकारी रुग्णालयात डॉक्टर होती. पियुषने त्यांच्या मुलीला मरण्यास भाग पाडले, असेही मिनाक्षीच्या वडिलांनी म्हटले आहे.
मीनाक्षीच्या आईने आरोप केला आहे की, ‘जावयाचे एका नर्ससोबत विवाहबाह्य संबंध होते. माझ्या मुलीला शारीरिक मारहाण केली जात होती. मारहाणीनंतर ती अनेकदा फोन करून सांगायची. ही आत्महत्या असल्याचे म्हटले जात असले तरी, ही आत्महत्या होती की हत्या, हे माहित नाही. शवविच्छेदनानंतरच खरे कारण समोर येईल. पियुषने तिच्या मुलीच्या नावावर कर्ज घेतले होते. त्यातील काही कर्ज गाडीसाठी, तर काही रुग्णालयासाठी होते.’ दरम्यान, पोलिसांनी तपास करून पियुषला अटक करावी, अशी मागणी मीनाक्षीच्या आई-वडिलांनी केली आहे.
सावत्र आई अन् मुलाच्या अनैतिक संबंधांचा झाला थरारक शेवट…
आंचलने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न करत घेतली थपथ अन् काही महिन्यातच…
पुणे! वकील नवऱ्यासोबत अनैतिक संबंधाच्या संशय; धक्कादायक माहिती समोर…
अनैतिक संबंध! पत्नीच्या प्रियकराला एकांतात बोलवले अन्…
नवऱ्याचे 19 महिलांशी अनैतिक संबंध, बेडरुमला स्पाय कॅमेरा लावला अन्…

