पुणे हादरले! मंगला टॉकीजसमोर युवकाची निर्घृण हत्या…
पुणे: पुणे शहरातील मंगला टॉकीजसमोर युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मंगळवारी (ता. १५) मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. नितीन मोहन म्हस्के असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.
नितीन म्हस्के हा मंगला टॉकीजमधून चित्रपट पाहून बाहेर आल्यानंतर त्याच्यावर टोळक्याने कोयता आणि तलवारीचा हल्ला केला. यानंतर दगडाने ठेचण्यात आले. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
मंगला टॉकीजला नितीन चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. चित्रपट पाहून बाहेर आल्यानतंर त्याच्यावर टोळक्याने हल्ला केला. मंगळवारी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास ही घटना घडली. नितीन म्हस्के याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याने खुनाचा प्रयत्न केला होता. त्याच प्रकरणात झालेल्या वादातून आता त्याची हत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे.
नितीन म्हस्के आणि त्याच्या सहकाऱ्यांनी एकावर शस्त्राने हल्ला केला होता. तेव्हा खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नितीन म्हस्के आणि त्याच्या साथीदारांवर दाखल करण्यात आला होता. नितीन चित्रपट पाहण्यासाठी मंगला टॉकीजला आल्याचे समजताच आरोपी चित्रपगृहाबाहेर येऊन थांबले होते. तिथेच नितीन म्हस्के याच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात नितीन म्हस्के जागीच ठार झाला. शिवाजीनगर पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
युवकाची विवाहापूर्वी गोळ्या झाडून हत्या; हल्लेखोराने ठेवले स्टेटस…
बांधकाम व्यावसायिकाच्या प्रेयसीची अनैतिक संबंधातून हत्या…
फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या…
येरवडामधील जेल कर्मचाऱ्याची प्रेमसंबंधातून आत्महत्या; गुन्हा दाखल…
जेजुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांची हत्या…
पुणे शहरात पोलिस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची हत्या करत संपवलं जीवन…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…