
HSRP Number Plate नसेल तर किती भरावा लागेल दंड…
मुंबई: सरकारने वाहनांसाठी नवीन नियम आणले असून, 2019 पूर्वी ज्या ज्या गाड्यांच्या नंबर प्लेज जुन्या आहेत किंवा 2019 नंतरही ज्या गाड्यांच्या नंबरप्लेट जुन्या आहेत त्यांना नव्या नंबरप्लेट बसवणं बंधनकार आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी वाहने खरेदी करणाऱ्यांना त्यांच्या वाहनांमध्ये उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट सक्तीने बसवाव्या लागतील. यासाठी परिवहन विभागाने चार महिन्यांचा कालावधी दिला आहे.
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
HSRP एक विशेष सुरक्षा वैशिष्ट्ये असलेली नंबर प्लेट आहे. यात 10 अंकी युनिक लेझर-ब्रांडेड आयडी नंबर आणि लेझरने कोरलेला कोड असतो. यामुळे ही प्लेट छेडछाड करणे शक्य नसते. ही प्लेट दुर्मिळ ॲल्युमिनियम धातूपासून बनलेली असते आणि त्यावर ‘IND’ बॅजिंग असते, ज्यावर अशोकचक्राचे होलोग्राम हॉट-स्टॅम्प केलेले असते. याव्यतिरिक्त, प्लेटवर रिफ्लेक्टिव्ह फिल्म असते, ज्यावर “INDIA” असे नमूद केलेले असते.
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अधिक सुरक्षित आहे. रस्ते अपघात, वाहनांचा वेग आणि वाहतूक नियम मजबूत करण्यासाठी हा उपक्रम करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अनिवार्य केल्या आहेत. १ एप्रिल २०१९ पूर्वी वाहने चालवणाऱ्या वाहन मालकांनी ही बसवावी लागेल. या नंबरप्लेटमुळे वाहतूक पोलिसांना वाहनांवर लक्ष ठेवणे अधिक सोप होईल. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना सहज पकडता येईल. त्यांच्याविरुद्ध चालान कारवाई करणे सोपे होईल, कारण या प्लेटमध्ये फॉन्ट आणि शैली एकसारखी आहे. जे अधिक चांगल्या प्रकारे ओळखता येते.
HSRP नंबरप्लेट बसवण्याची अंतिम तारीख 30 जून देण्यात आली आहे. 30 जूनआधी नंबरप्लेट बसवून घ्यावी लागणार आहे. दुचाकी, तिनचाकी अथवा चारचाकी वाहनाला नंबर प्लेट बसवून घेतली नाही तर 5000 ते 10,000 रुपयांचा दंड बसणार आहे. शिवाय, नियम मोडणाऱ्यांना दुप्पट दंड आकारला जाणार आहे.
राज्यातील वाहनांच्या HSRP नंबर प्लेटबाबत महत्त्वाची बातमी…
FASTag नवीन नियम लागू; दंड टाळण्यासाठी काय करावे? घ्या जाणून…
वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक, किंमत किती अन् कुठे मिळेल? घ्या जाणून…
महाराष्ट्रात वाहनांशी संबंधित नियम बदलणार; अन्यथा 10 हजार रुपयांचा दंड…
खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…
वाहनांवरील नंबर प्लेट बाबत महत्त्वाची माहिती घ्या जाणून…
वाहनधारकांना मोठा दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहनवरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य…
वाहतूकीला शिस्त! पोलिसांनी गाडी उचलल्यास किती होणार दंड…
राज्यातील वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ…

