
वाल्मिक आणि बीड पोलिसांची Audio क्लिप व्हायरल; सनीने सगळचं सांगितले…
बीड : वाल्मिक कराड आणि बीडमधल पोलिस अधिकाऱ्यांची कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही ऑडिओ क्लिप बनावट नोटा प्रकरणात आरोपी असलेल्या सनी आठवले या आरोपीने स्वतःच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. या ऑडिओमुळे खळबळ उडाली आहे.
संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणी आरोपी असलेला आरोपी वाल्मिक कराड आणि बीड पोलिसांची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये कराड आणि पोलिसांमधील संवाद असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. सनी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या संबंधी वाल्मीक कराड आणि पोलिस निरीक्षक शितकुमार बल्लाळ यांच्यात थेट संवाद झाला असल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. पण, सदर क्लिप खोटी असून, क्लिपमधील संवाद माझा नाही. सनी आठवले हा गुन्हेगार आहे. त्याचा भाऊ देखील गुन्हेगार आहे. सनी आठवले सध्या फरार आहे. यातील आवाज माझा नाही. याप्रकरणी मी गुन्हा दाखल करणार आहे, असे पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ म्हणाले.
सनी आठवले याने म्हटले आहे की, ‘बीडमध्ये नेमकं चाललंय काय? का मला गुंतविलं जातंय? खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत? देशद्रोहासारखा खोटा गुन्हा दाखल करून आयुष्य उद्ध्वस्त केलं जातंय? देशद्रोहाचा गुन्हा डोक्यावर घेत जगण्यापेक्षा मेलेलं बरं, शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ हे वाल्मिक अण्णा कराड यांचे मित्र असून मी धनंजय मुंडे यांच्यासोबत दीपज्योत ग्रुपच्या माध्यमातून जोडलो गेले होतो. परंतु काही कारणास्तव मी त्यांच्यापासून दूर आल्यानंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत तीन ते चार वेळेस आढळून आल्यामुळे वाल्मिक अण्णा कराड यांना माझा राग आल्याने सनी आठवलेला कोणत्याही गुन्ह्यामध्ये गुंतविण्याचे आदेश पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांना दिले होते. त्यावर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी लागलीच कलम 107 मध्ये मला पोलिस स्टेशनला बोलावले होते. मी पोलिस निरीक्षक बल्लाळ यांच्या बोलवण्यावरून पोलिस स्टेशनला गेलो नाही म्हणून तो राग मनामध्ये धरून आणि अण्णांच्या सांगण्यावरून बनावट नोटा छापाईच्या प्रकरणांमध्ये माझा कसलाही संबंध नसताना संशयित आरोपी म्हणून त्यामध्ये मला जोडण्यात आले आहे.
दीपज्योत ग्रुपच्या माध्यमातून असंख्य मित्र जोडलेले आहेत. बनावट नोटा छपाई प्रकरणी मनीष क्षीरसागर हा माझा मित्र आहे, परंतु तो काय करतो याची पूर्वकल्पना मला नाही. वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ हे काम करत आहेत. माझ्यावर बनावट नोटा छापाई प्रकरणी खोटा गुन्हा दाखल झाल्यानंतर मी वाल्मिक कराड यांना फोनद्वारे संपर्क साधला आणि मी आमदाराचे काम करत आहे, असे सांगितले. माझं चुकलं मला माफ करा, असं बोलल्यानंतर लागलीच वाल्मिक अण्णा कराड यांनी पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांना फोन करून “त्या सनीला नका गुंतवू संशयितमध्ये, झाली त्याची चूक झाली ते माफी मागायला लागलंय जाऊ द्या, द्या विषय सोडून” अरे अण्णा सनीबद्दल शिफारस करू नका, संदीप क्षीरसागर शिफारस करत आहे. अशा आशयाची रेकॉर्डिंग मी माझ्या फेसबुक अकाऊंटवरून आपणास शेअर करत आहे.
केजचे पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील, चंद्रभान गीते यांनी अक्षय आठवले याला या अगोदर मादळमोही या ठिकाणाहून अटक केली होती. परंतु एफआयआरमध्ये केज तालुक्यातील बरड फाटा येथे अटक केल्याचे दाखवले आहे. याबाबत पुराव्यानिशी विशेष पोलिस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे तक्रार सादर केली असून त्यामध्ये पाडळशिंगी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज जोडण्यात आलेले आहेत. सदर प्रकरणी वाल्मिक कराड यांनीच या खोट्या गुन्ह्यांमध्ये माझे नाव जाणीवपूर्वक टाकले होते.
वाल्मीक कराड याची प्रकृती खालावली; तुरुंगातून हलवलं, ICU मध्ये उपचार सुरू…
वाल्मिक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी…
वाल्मिक कराड याला 7 दिवसांची पोलिस कोठडी…
संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ…
मोठी बातमी! वाल्मिक कराड अडचणीत, मकोका अंतर्गत गुन्हा…
संतोष देशमुख हत्या प्रकरण! बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय…
धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू; काही झालं तरी…
वाल्मिक कराड याचा आणखी एक कारनामा समोर, शेतकऱ्यांना लुटले…
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सातही आरोपींवर मोक्का…
वाल्मिक कराडनंतर मुलगाही अडचणीत; पिस्तूलाचा धाक दाखवत…
वाल्मिक कराड याच्या कारवाईचा आवळला फास; नेते चौकशीच्या रडारवर…
वाल्मीक कराड याचा आणखी एक कारनामा समोर…
बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 40 खूनाचे तर 191 खुनाचे प्रयत्न…
बीड शहर पोलिस मुख्यालयातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या…
सुदर्शन घुले! मिशी कापली, लघवीला जातो म्हणाला अन् थेट गुजरातला पळाला…
बीड पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…
सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात…
वाल्मिक कराडनंतर आणखी एक मोठा मासा गळाला; पण तो कोण?…
वाल्मिक कराड अडचणीत! संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याची पोलिसांसमोर कबुली…
संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे…
वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी…
वाल्मिक कराड प्रवास: घरगडी ते बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र…
वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…
वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…
संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…
बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…
आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी मारेकरी ताब्यात, हत्येचं गुढ…
भाजप आमदार योगेश टिळेकर हे मामाच्या निर्घृण हत्येनंतर म्हणाले…
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…
भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…
पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…