पोलिसांची ‘सिंघम स्टाईल’ कारवाई; कोयते फिरवणाऱ्यांना रस्त्यावर बसवलं अन्…

पुणे : कोयत्याचा धाक दाखवून भरवस्तीत दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांना सांगवी पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. दुकानदाराकडे ४ लाख रुपयांची खंडणी मागून तोडफोड करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकत त्यांची परिसरातून धिंड काढली. पोलिसांच्या या ‘सिंघम’ स्टाईल कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

ओंकार उद्धव बाबर आणि सोपान गजानन बुलाखे अशी अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. या दोघांनी पिंपळे सौदागरमधील एका दुकानात शिरून दुकानदाराकडे ४ लाख रुपयांची मागणी केली होती. दुकानदाराने पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांनी कोयते नाचवत दुकानातील साहित्याची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी वेगाने चक्र फिरवून आरोपींना अटक केली. परिसरात निर्माण झालेली गुंडांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी एक धाडसी पाऊल उचलले. आरोपींना घटनास्थळी नेऊन त्यांची भररस्त्यात धिंड काढण्यात आली. यावेळी झालेलली अवस्था पाहून नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले. सांगवी पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे पोलिसांनी बंडू आंदेकर याच्या तिन्ही पोरांची काढली धिंड…

पुणे पोलिसांनी आरोपींची काढली धिंड; निलेश घायवळ लंडनला…

पुणे पोलिसांनी गुंडांना आणलं रस्त्यावरुन अन् काढली धिंड…

धक्कादायक! प्रेमीयुगलाची हत्येपूर्वी काढली होती गावातून धिंड…

पुणे शहरात गुंडाची रॅली काढणाऱ्यांविरोधात पोलिसांची कारवाई; काढली धिंड…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!