
हृदयद्रावक! आईसोबत कपडे धुण्यासाठी गेले अन् कुटुंबातील तिंघाचा झाला मृत्यू…
सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील खडकी येथे आईसोबत धुणे धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात असून खडकी गावावर शोककळा पसरली आहे.
वैशाली अनिल घोडके (वय ३५) या आपली मुले श्रेया अनिल घोडके (वय १२) आणि सोहम अनिल घोडके (वय १०) यांच्यासह गावातील साठवण तलावावर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने किंवा पाय घसरल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकाला वाचवण्याच्या नादात तिघेही पाण्यात बुडाले असावेत, असा अंदाज आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
घटनेची माहिती मिळताच मंगळवेढा पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. एकाच कुटुंबातील आई आणि दोन मुलांवर काळाने झडप घातल्याने घोडके कुटुंबासह संपूर्ण परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिस पुढील तपास करत ाहेत.
मृतांची नावे समोर पुढीलप्रमाणे…
1) वैशाली अनिल घोडके (वय 35),
2) श्रेया अनिल घोडके (वय 12)
3) सोहम अनिल घोडके (वय 10)
View this post on Instagram
हृदयद्रावक! लग्नाच्या पत्रिकेवर ज्याचं नाव त्याच मुलावर अंत्यसंस्काराची वेळ…
हृदयद्रावक! नांदेडमध्ये पाण्यात बुडून चार लहान मुलांचा मृत्यू…
हृदयद्रावक! नवविवाहित दांपत्याचा होरपळून मृत्यू; एका चितेवर तिघांचा अंत्यविधी…
हृदयद्रावक! नाशिकमध्ये गेट टुगेदरला गेले अन् घात झाला, 9 जणांचा जागीच मृत्यू; पाहा नावे…
हृदयद्रावक! एक नवविवाहित तर दुसऱ्या बहिणाचा विवाहापूर्वी अपघाती मृत्यू…

