
वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी…
केज (बीड) : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संलग्न असलेल्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडवर गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केवळ खंडणीचा आरोप नसून हत्या प्रकरणाचाही आरोप असल्याने त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली. सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून केज न्यायालयाने वाल्मिकला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे.
खंडणीचा गुन्हा नोंद झाल्यावरनंतरही तब्बल दोन आठवडे फरार असलेला वाल्मिक कराड मंगळवारी (ता. ३१) पुण्यातील सीआयडी पोलिसांना शरण आला. गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात येण्याआधी वाल्मिकने ध्वनीचित्रफित प्रसिद्ध करून आपल्यावरील आरोप फेटाळले. राजकीय आकसातून माझ्यावर गुन्हे दाखल झाल्याचे सांगत हत्या प्रकरणात माझ्यावर होत असलेले आरोप खोटे असून पोलिसांच्या तपासात जर गुन्हा सिद्ध झाला तर न्यायदेवतेची शिक्षा मी मान्य करेन, असे तो म्हणाला. शरणागतीची ध्वनिचित्रफित प्रसिद्ध करून पुढच्या काही मिनिटांत पुण्यातील पाषाण रस्त्यालगत असलेल्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या मुख्य कार्यालयात तो स्वत:च्या गाडीतून आला हे विशेष. अधिकाऱ्यांनी त्याची जुजबी चौकशी करून त्याला केजच्या न्यायालयात हजर केले.
दरम्यान, वाल्मिक कराडला मंगळवारी रात्री दहा वाजता केज न्यायालयात हजर करण्यात आले. खंडणी आणि हत्या अशा गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यात आरोप झाल्याने कराडच्या अधिक चौकशीसाठी त्याला १५ दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील जे बी शिंदे यांनी केली. वाल्मिक कराड हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावर राजकीय आकसातून आरोप होत आहेत, असा दावा करून सीआयडीला संपूर्ण प्रकरणात सहकार्य करू, आवाजाचे नमुने देऊ, आम्ही स्वत:हून शरण आलो, त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी मिळावी, असा युक्तिवाद कराडचे वकील अशोक कवडे यांनी केला. त्याचवेळी खंडणीचा गुन्हा दाखल झाला म्हणजे पोलिस कोठडी द्यावा, असे प्रावर्धान नाही, असा युक्तिवादही कराडचे वकील अशोक कवडे यांनी केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश एस व्ही पावसकर यांनी वाल्मिकला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आतापर्यंत एकूण सात आरोपींविरोधात केज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या सातपैकी जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे या चौघांना पोलिसांनी आधीच अटक केली आहे. तर सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे अद्यापही फरार आहेत.
वाल्मिक कराडला घेऊन सीआयडीचे पथक दहा वाजता केज न्यायालयाच्या परिसरात पोहोचले. केजचे पोलिस स्टेशन आणि न्यायालय परिसरात मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. सायंकाळी पाच वाजल्यापासून या परिसरात मोठा जमाव जमायला सुरुवात झाली होती. मात्र पोलिसांनी जमावाला पांगविले. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात होती.

वाल्मिक कराड प्रवास: घरगडी ते बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र…
वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…
वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…
संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…
बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…
आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी मारेकरी ताब्यात, हत्येचं गुढ…
भाजप आमदार योगेश टिळेकर हे मामाच्या निर्घृण हत्येनंतर म्हणाले…
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…
भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…
पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…
Video: पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन जीवावर उदार होत अपहरण कर्त्यांची केली सुटका…
पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचे अपहरण करून खून…
पुणे शहरातून अपहरण झालेल्या युवकाचा फिल्मी स्टाईलने केला पोलिसांनी तपास अन्…
पुणे जिल्ह्यातील माजी उपसरपंचाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फेकले पाण्यात…
पुण्यातील घरमालकाचे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या तिघांना बंगालमध्ये अटक

