
भोंदू राजेंद्र गडगे याच्याकडे निघाले 200 व्हिडीओ अन् 90 गोळ्या…
संगमनेर: मंत्रोच्चार करून आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या भोंदू राजेंद्र गडगे याच्या भोवती पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे. गडगेवर पोलिसांनी दत्ताधाम येथे कारवाई केली असून, २०० पेक्षा जास्त व्हिडीओ आणि ९० पेक्षा अधिक औषधे पोलिसांनी जप्त केले आहे. या औषधांचा वापर कशासाठी होत होता, याचा शोध पोलिस घेत आहे.
भोंदू अशोक खरात याचं प्रकरण ताजे असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यातील एक भोंदू लोकांची आर्थिक लुट करत मंत्रोच्चाराने दुर्धर आजार बरे करत असल्याचा दावा करणारा बाबा पोलिसांच्या ताब्यात आहे. संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील दत्तधाम सरकार नावाने या त्याने आपला दरबार सुरू केला होता. राज्यभरातून हजारो लोक त्याच्या भोंदूगिरीचे बळी ठरले. गेल्या कित्येक वर्षांपासून मंत्र तंत्राने दुर्धर आजार बरे करण्याचा त्याचा व्यवसाय सुरू होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव रंजना गवांदे यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर हा भोंदू गजाआड गेला आहे. त्याच्या दरबारातून पोलिसांनी अनेक महत्वाचे पुरावे हस्तगत केले असून काही औषधाचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. याने आजवर अनेकांचे आर्थिक, मानसिक आणी शारीरिक शोषण केले असून पिडीतांनी समोर यावं आणी गुन्हा दाखल करावा असे आवाहन अंनिसच्या राज्य सचिव रंजना गवांदे यांनी केले आहे.
पोलिसांनी गडगेकडून आतापर्यंत २०० पेक्षा अधिक व्हिडीओ जप्त केले आहे. त्याचबरोरब नाशिक पोलिसांनी दत्तधाम येथून ९० पेक्षा अधिक औषधे जप्त केली असून वैद्यकीय तपासणीसाठी पाठवली आहे. गडगेकडून १३ प्रॉपर्टी खरेदीची माहितीही समोर आली आहे. याबद्दल सब-रजिस्ट्रार कार्यालयाकडून मालमत्तेची माहिती मागवली जाणार आहे. भोंदू गडगेकडे असलेल्या १० वेगवेगळ्या बँकांमधील खात्यांचा तपास सुरू आहे. तसेच ‘पुत्र प्राप्ती’ प्रकरणी ग्रामीण रुग्णालयाकडून भोंदू गडगेला नोटीस सुद्धा बजावली आहे, अशी माहिती अप्पर पोलिस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिली.
महाराष्ट्रील आणखी एका भोंदूबाबाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
पुणे जिल्ह्यात भोंदूबाबाने महिलेवर केला अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
महाराष्ट्रातील आणखी एका भोंदूचा महिलेसोबत किळसवाणा प्रकार…
महाराष्ट्रात आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड; महिलेवर अत्याचार…
अशोक खरात याचा युवतीवर 4 वेळा अत्याचार, सहाव्या गुन्ह्याबाबत धक्कादायक माहिती…

