
संतोष देशमुख हत्या प्रकरण! बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय…
बीड: मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. येत्या काही दिवसांमध्ये या आंदोलनाची धग वाढण्याची शक्यता असल्याने आता बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती बीड जिल्ह्यात 14 तारखेपासून 28 तारखेपर्यंत जमावबंदी राहणार आहे.
वाल्मिक कराड याच्यावरच फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे. मात्र, वाल्मिक कराडलाही मोक्का लावून त्याच्यावर 302 कलमातंर्गत कारवाई करा, असा आग्रह धरण्यात आला आहे. या मु्द्द्यावरुन विरोधक आणि देशमुख कुटुंबीयांना आंदोलन सुरु केले आहे. यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे हेदेखील सातत्याने सहभागी होत आहेत. विविध आरक्षण आंदोलनाची दाहकता लक्षात घेता बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. आज (मंगळवार) मध्यरात्रीपासून 28 तारखेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना मोर्चे निदर्शने आंदोलने धरणे करण्यासाठी जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही. बीडचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी हे आदेश पारित केले आहेत.
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे मंगळवारी एसआयटी पथकाचे प्रमुख डॉ. बसवराज तेली यांची भेट घेणार आहेत. आम्ही आज तेली साहेबांची भेट घेणार आहोत. खंडणी ते खून प्रकरण यातील ते कटकारस्थान करणारे जे आरोपी आहेत त्यांना मोक्का अंतर्गत कारवाई करून 302 अंतर्गत फाशी लावावी ही माझी मागणी असल्याचे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची 14 दिवसांची पोलिस कोठडी संपत असल्यामुळे आज (मंगळवार) त्याला केज येथील सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे.
धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू; काही झालं तरी…
वाल्मिक कराड याचा आणखी एक कारनामा समोर, शेतकऱ्यांना लुटले…
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सातही आरोपींवर मोक्का…
वाल्मिक कराडनंतर मुलगाही अडचणीत; पिस्तूलाचा धाक दाखवत…
वाल्मिक कराड याच्या कारवाईचा आवळला फास; नेते चौकशीच्या रडारवर…
वाल्मीक कराड याचा आणखी एक कारनामा समोर…
बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 40 खूनाचे तर 191 खुनाचे प्रयत्न…
बीड शहर पोलिस मुख्यालयातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या…
सुदर्शन घुले! मिशी कापली, लघवीला जातो म्हणाला अन् थेट गुजरातला पळाला…
बीड पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…
सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात…
वाल्मिक कराडनंतर आणखी एक मोठा मासा गळाला; पण तो कोण?…
वाल्मिक कराड अडचणीत! संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याची पोलिसांसमोर कबुली…
संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे…
वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी…
वाल्मिक कराड प्रवास: घरगडी ते बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र…
वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…
वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…
संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…
बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…
आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी मारेकरी ताब्यात, हत्येचं गुढ…
भाजप आमदार योगेश टिळेकर हे मामाच्या निर्घृण हत्येनंतर म्हणाले…
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…
भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…
पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

