
धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू; काही झालं तरी…
बीड : मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासह ग्रामस्थांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे. वाल्मीक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी आणि देशमुख खून प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, या दोन मागण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करायला सुरुवात केली आहे. यामुळे टाकीभोवती ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. अनेकांनी त्यांना खाली येण्याची विनंती केली. मात्र, काहीही झालं तरी खाली येणार नाही, अशी भूमिका धनंजय देशमुख यांनी घेतली आहे. जोपर्यंत वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लागत नाही आणि फरार आरोपी कृष्णा आंधळे याला जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा देशमुख यांनी घेतला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही धनंजय देशमुख यांची मनधरणी केली आहे. त्यांनी हात जोडून धनंजय देशमुख यांना पाण्याच्या टाकीवरून खाली उतरण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी खाली उतरण्यास नकार दिला. मनोज जरांगे यांनी धनंजय देशमुख यांना फोन करून, मी तुमच्यासोबत आहे, खाली या. आपल्याला माणूस महत्त्वाचा आहे. जीव देऊन चालणार नाही. कुटुंबाला आधार कोण आहे. तुम्ही खाली या, तुमच्यासमोर हात जोडतो” अशा शब्दांत जरांगे फोनवरुन मनधरणी केली. फोनवर बोलताना मनोज जरांगे पाटील यांच्या डोळ्यात अश्रू आल्याचे दिसून आले. तर यावेळी धनंजय देशमुख यांच्या देखील डोळ्यात पाणी आले होते.
धनंजय देशमुख म्हणाले, ‘माझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जात आहे. पोलिसांनी एकदाही चौकशी केली नाही. त्यांना घटनाक्रम विचारावा तर त्यांच्याकडून काहीच सांगितलं जात नाही. पोलीस स्टेशनला गाडी आणि चिठ्ठी सापडली होती, त्यात चार नावं होती. माझ्या भावाच्या गाडीमागे अजून एक गाडी होती, याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. तीन दिवसात पोलिसांनी तपास सीआयडीकडे दिला, आम्हाला विचारलं पण नाही, परस्पर सगळं सुरू आहे. न्याय मागताना तुम्ही केस दाखल केल्या तर न्याय कशाला मागू मी आंदोलन करतो.’
मनोज जरांगे पाटील म्हणाले, आरोपी जर सुटला तर खंडणीतील असो किंवा धनंजय मुंडेची टोळी असो, मी जगणे मुश्किल करेल. मी उलट्या काळजाचा आहे. त्यांनी आत्महत्या करेल म्हटले आणि माझे अंग थरथर करायला लागले. त्यांचे म्हणणं असं दिसतंय की, आम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलो. खरे तर मुख्यमंत्री अशा वेळी कुटुंबाकडे येत असतात. मुख्यमंत्र्यांना देशमुख कुटुंबीयाने सांगितलं की, खंडणी आणि खुनातील आरोपी एकच आहेत. त्यांच्यावर मोक्का लावून त्यांना 302 मध्ये घ्यावे. कुटुंबाने मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवला. त्यामुळे मराठ्यांनी देखील विश्वास ठेवला. राज्यात मराठा समाज हा मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर शांत आहे. परंतु, अशी वेळ जर देशमुख कुटुंबीयांवर येणार असेल, तर मुख्यमंत्र्यांनी हलक्यात घेऊ नये.’

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सातही आरोपींवर मोक्का…
वाल्मिक कराडनंतर मुलगाही अडचणीत; पिस्तूलाचा धाक दाखवत…
वाल्मिक कराड याच्या कारवाईचा आवळला फास; नेते चौकशीच्या रडारवर…
वाल्मीक कराड याचा आणखी एक कारनामा समोर…
बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 40 खूनाचे तर 191 खुनाचे प्रयत्न…
बीड शहर पोलिस मुख्यालयातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या…
सुदर्शन घुले! मिशी कापली, लघवीला जातो म्हणाला अन् थेट गुजरातला पळाला…
बीड पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…
सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात…
वाल्मिक कराडनंतर आणखी एक मोठा मासा गळाला; पण तो कोण?…
वाल्मिक कराड अडचणीत! संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याची पोलिसांसमोर कबुली…
संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे…
वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी…
वाल्मिक कराड प्रवास: घरगडी ते बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र…
वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…
वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…
संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…
बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…
आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी मारेकरी ताब्यात, हत्येचं गुढ…
भाजप आमदार योगेश टिळेकर हे मामाच्या निर्घृण हत्येनंतर म्हणाले…
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…
भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…
पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

