वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…

पुणे : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली असून, तीन आरोपी अद्याप फरार आहेत. या प्रकरणाचा तपास सीआयडी करत असून गेल्या तीन दिवसापासून सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी बीड जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. या सगळ्या घडामोडीत वाल्मिक कराडने पुण्यात आत्मसर्मपण (सरेंडर) केल्याचे वृत्त समोर आले होते. यावर सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये बीडमध्ये जवळपास सीआयडीच्या नऊ टीम कार्यरत आहेत. टीममध्ये सुमारे दीडशेहून अधिक सीआयडीचे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व टीमने सुमारे 100 हून अधिक लोकांची या प्रकरणांमध्ये आतापर्यंत चौकशी केली आहे. वाल्मिक कराड याच्याशी संबंधित असलेले एका महिलेची आज सकाळपासून चौकशी केल्याची माहिती आहे. सीआयडीने या प्रकरणातील संशयित मास्टरमाईंड वाल्मिकी कराडही लपला आहे. सीआयडीने त्याचे बँक खाते गोठवले असून त्याच्या भोवती फास आवळण्यास सुरुवात केली आहे.

वाल्मिक कराड याने रविवारी रात्री उशिरा पुण्यात सीआयडी अधिकाऱ्यांसमोर सरेंडर केल्याची माहिती समोर आली होती. वाल्मिक कराडने सरेंडर केल्याच्या वृत्तानंतर एकच खळबळ उडाली होती. मात्र, सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत अधिक माहिती देताना वृत्त फेटाळून लावले. वाल्मिक कराड याला अटक केली अथवा त्याने सरेंडर केले, अशी कुठलीही कारवाई झाली नसल्याचे एडीजी सीआयडी प्रशांत बुरुड यांनी सांगितले.

तपास पथकाने आरोपींचे दोन मोबाईल जप्त केले आहेत. गाडीवर आढळलेले ठसे आरोपींसोबत जुळले. फरार असलेल्या 4 आरोपींचे बँक खाते गोठवण्यात आले. यामध्ये वाल्मिक कराड याच्या खात्यांचा समावेश आहे. आरोपींचा केरळ, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गोव्यात शोध सुरू करण्यात आला आहे. आजपर्यंत 115 जणांची CID ने केली चौकशी केली आहे. वाल्मिक कराड याच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या दोन महिलांवर CID ची बारीक नजर आहे. त्यांची चौकशीदेखील झाली होती.

santosh-deshmukh-beed
santosh-deshmukh-beed

संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…

बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…

महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी मारेकरी ताब्यात, हत्येचं गुढ…

भाजप आमदार योगेश टिळेकर हे मामाच्या निर्घृण हत्येनंतर म्हणाले…

आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…

भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…

पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…

महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

Video: पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन जीवावर उदार होत अपहरण कर्त्यांची केली सुटका…

पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचे अपहरण करून खून…

पुणे शहरातून अपहरण झालेल्या युवकाचा फिल्मी स्टाईलने केला पोलिसांनी तपास अन्…

पुणे जिल्ह्यातील माजी उपसरपंचाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फेकले पाण्यात…

पुण्यातील घरमालकाचे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या तिघांना बंगालमध्ये अटक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!