पिंपरी-चिंचवडमध्ये फिल्मी स्टाईलने भरदिवसा खून; दोघांना अटक…

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये बुधवारी (ता. २३) भरदिवसा झालेल्या हत्याकांड प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. सागर शिंदे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर योगेश जगताप आणि हृषिकेश खरात अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. मृत सागर शिंदे आणि दोघे मारेकरी एकाच वाहनातून जात असताना त्यांच्यात भिशीच्या पैशांवरुन वाद झाले आणि त्याचे पडसाद हत्येत उमटले.

पिंपरी चिंचवडमध्ये भरदिवसा सागर शिंदेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. फिल्मी स्टाईलने घडलेल्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. बुधवारी सायंकाळी पाच वाजता औंध-रावेत बीआरटी मार्गावरील रक्षक चौकालगत ही धक्कादायक घटना घडली. गोळीबार झाल्यानंतर त्याच वाहनाने काही गाड्यांना धडकही दिली होती. दिवसा घडलेल्या घटनेने मार्गावरुन प्रवास करणारे नागरिक भयभीत झाले होते.

दरम्यान, या घटनेची सांगवी पोलिसात नोंद करण्यात आली. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरु केला. तपासादरम्यान योगेश जगताप आणि हृषिकेश खरात यांना अटक करण्यात आली. सागर शिंदे याच्या बंदुकीनेच त्याची हत्या करण्यात आल्याची कबुली या दोघांनी दिली.

सागर शिंदे हा 2013 साली हत्येच्या गुन्ह्यात अटकेत होता. 2018 साली तो तुरुंगात बाहेर आला, त्यानंतर तो पेपर आणि दूध विक्री व्यवसाय करायचा. योगेश आणि हृषिकेश हे सलून आणि रिक्षा चालवतात. प्रत्येक महिन्याला दीड लाखांच्या भिशीचं वाटप होतं, यावेळी नंबर कोणाला द्यायचा यावरुन त्यांची चर्चा सुरु होती. तिघेही चतु:शृंगी मंदिर परिसरातून काळेवाडीकडे निघाले होते. हृषिकेश गाडी चालवत होता, सागर पुढे डावीकडे तर योगेश मागे बसला होता. यावेळी भिशीच्या वाटपावरुन वाद विकोपाला गेला. चालत्या गाडीतच सागरने बंदूक बाहेर काढली अन् धमकवायला सुरुवात केली. त्यावेळी योगेशने बंदूक हिसकावली अन् पाठीमागून सागरवर गोळी झाडली. त्यानंतर सागर गाडीचे दार उघडून धावू लागला मग योगेशने दुसरी गोळी झाडली. यात सागरचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सागरला तिथेच सोडून योगेश आणि हृषिकेश पसार झाले. त्यानंतर दोन तासांतच गुंडा विरोधी पथकाने या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पिंपरी-चिंचवड परिसरात कोयत्याचा धाक दाखवून चोरी करणारी टोळी जेरबंद…

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना घेतले ताब्यात…

पिंपरी-चिंचवडमधील पोलिसकाकांचे अपघाती निधन…

पिंपरी-चिंचवड पुन्हा हादरले! युवकाची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या…

हिंजवडीत दुचाकीस्वाराच्या शरीरावर तब्बल दहा मिनिटे ट्रकचे चाक…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

One thought on “पिंपरी-चिंचवडमध्ये फिल्मी स्टाईलने भरदिवसा खून; दोघांना अटक…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!