
धक्कादायक! प्रियकराने प्रेयसीला OYO रूमवर बोलावले अन् पुढे…
लखनौ (उत्तर प्रदेश): प्रियकराने मैत्रीणीला OYO रूमवर बोलवल्यानंतर खोलीला बाहेरून कुलूप लावून घटनास्थळावरून पळ काढला होता. रूमची तपासणी केल्यानंतर युवतीचा (वय २२) मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे.
OYO रेड बिल्डिंगच्या गेस्ट हाऊसमधील रूम नंबर 105 मध्ये युवतीचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. युवतीसोबत तिचा बॉयफ्रेंडही रूममध्ये थांबला होता. दोन दिवसांनंतरही खोलीतून कोणीही बाहेर न आल्याने आणि खोलीतून दुर्गंधी येऊ लागली, तेव्हा पोलिसांना कळवण्यात आलं. माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि खोलीतील बेडवर मुलीचा मृतदेह पडलेला दिसला. युवतीच्या प्रियकराने खोलीला बाहेरून कुलूप लावून घटनास्थळावरून पळ काढला होता.
पोलिसांनी सांगितले की, लखनौच्या चिनहट येथील देवा रोडवर असलेल्या रेड बिल्डिंग गेस्ट हाऊसमध्ये एका मुलीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत खोलीत आढळून आला. मृत युवती औरंगाबाद, बाराबंकी येथील रहिवासी आहे. बाराबंकी येथील औरंगाबाद पोलिस ठाण्यात ३ जून रोजी ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. ती 3 जून रोजी प्रियकरासह गेस्ट हाऊसमध्ये आली होती. पुढील तपास सुरू आहे.

नवऱ्याच्या प्रेयसीला फोन करून बोलवलं अन् पुढे…
प्रेम! प्रेयसी असलेल्या मामाच्या मुलीला ओढ्याजवळ बोलावले अन् पुढे…
प्रेमात वेडे! प्रेयसीसह जवानाला बेड्या; नवऱ्याचा गेला जीव…
प्रेयसीच्या साखरपुड्यानंतर नवऱ्याच्या घराच्या गेटला लावली बॉम्बसदृश वस्तू अन् पुढे…
प्रेयसीच्या गालावर गरम लोखंडी रॉडने लिहिलं स्वतःचं नाव…

