मुंढवा पोलिसांकडून अवैध दारुवर मोठी कारवाई; दोघांना अटक…

पुणे (संदिप कद्रे): मुंढवा पोलिस ठाणे कडून अवैध दारुवर मोठी कारवाई करण्यात आली असून, १,२५,४०० रुपये किंमतीची दारु नष्ट करण्यात आली आहे. शिवाय, दोन आरोपींना अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैध धंदे बंद करणे करीता नागरिकांमध्ये जनजागृती होऊन अवैध धंद्यावर आळा बसण्यासाठी संपुर्ण पुणेकरांना सोशल मिडीया यामाध्यमातुन फेसबुक, इन्टाग्राम, व्हॉटस्अप, पत्रकार मुलाखत इत्यादी माध्यद्वारे अवाहन करण्यात आले होते. पोलिस आयुक्तांच्या सुचने प्रमाणे मा. वरिष्ठ पोलिस निरीक्षक, महेश बोळकोटगी, मुंढवा पोलिस ठाणे यांनी देखील स्थानिक नागरिक, व्यवसाईक, सोसायटी धारक यांच्या बैठक घेवून अवैध धंदे निदर्शनास येताच पोलिस दलास त्याबाबत माहिती द्यावी असे अवाहन केले होते.

मुंढवा पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात राहणारे नागरिक यांचे मार्गदर्शक सुचना प्रमाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, महेश बोळकोटगी, मुंढवा पोलिस ठाणे यांनी ०७/०२/२०२४ रोजी २१ / १५ वा. मुंढवा पोलिस ठाणे कडील रात्रगस्त अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक, विलास सुतार, तपास पथक अंमलदार यांना पोलिस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणी, पाहिजे / फरारी आरोपी शोध तसेच गुन्हे प्रतिबंधक करणेकरीता पेट्रोलिंग करून प्रभावी कारवाई करणे बाबत सुचना देवून पेट्रोलींग कामी रवाना केले. २२/०३/२०२४ रोजी पहाटे ०४/०० वा. चे दरम्यान मुंढवा पोलिस ठाणे कडील रात्रगस्त अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक माळी, तपास पथकाचे अंमलदार, पोलिस मित्र असे झेड कॉर्नर परिसरात पेट्रोलींग करीत असताना एक महींद्रा कंपनीची मॅक्झीमा पिकप गाडी वेगात गेलेने सदर गाडीचा संशय आल्याने तपास पथकातील
अंमलदार व पोलिस मित्र यांनी खाजगी वाहनाने पाठलाग करुन गाडीस थांबविले.

सदर गाडी चालक याने लोखंडी कोयता दाखवुन गाडी आडवायची नाही. तेव्हा मुंढवा पोलिस ठाणे कडील आम्ही पोलिस असल्याची माहिती दिल्याने लोखंडी हत्यार तेथेच टाकुन गाडीतील व्यक्तीसह पळून जाऊ लागल्याने मुंढवा पोलिस ठाणे पोलिसांनी पाठलाग करुन काही अंतराव त्यांना पकडले. संशय असल्याने सदरचे वाहन चेक केले असता प्लास्टिकचे ड्रम भरलेले असल्याचे दिसल्याने चौकशी करुन खात्री केली असता गावठी हातभट्टीची दारु असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. सदर घटनेची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक, महेश बोळकोटगी, मुंढवा पोलिस ठाणे यांना प्राप्त होताच त्यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून तात्काळ कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश दिले.

मुंढवा पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आई-मुलीची घडवून आणली भेट…

मुंढवा पोलिसांनी गावठी पिस्टलसह तडीपार आरोपीला केले गजाआड…

मुंढवा पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला केले गजाआड…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!