
महिला क्रिकेटरने मुंबईतील उद्योगपतीला अडकवलं सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अन्…
मुंबई : मुंबईतील एका उद्योगपतीला महिला क्रिकेटरने सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिला क्रिकेटपटूने या उद्योगपतीकडून तब्बल 63 लाख रुपये उकळले. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने संबंधित महिला क्रिकेटर आणि तिच्या भावासह आणखी एकाला अटक केली आहे.
फारखांदा खान असे महिला क्रिकेटरचे नाव असून ती जम्मू-काश्मीरची असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी फारखांदा खान, तिचा भाऊ बाझिल अझीझ खान आणि त्यांचा साथीदार उद्दीन वाणी यांना अटक केली आहे. फरखांदा खान ही जम्मू काश्मीरची राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहे. ती महिला टी-20 लगीमध्येही सहभागी झाली होती.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
प्राथमिक माहितीनुसार, फारखांदा आणि तिच्या भावाला दिल्लीतील एका हॉटेलमधून तर साथीदार इम्तियाज वाणी याला श्रीनगर येथून अटक करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील कुलाब्याचा रहिवासी असलेला व्यावसायिक (वय २८) हा 2024 मध्ये काही काळ पश्चिम उपनगरात वास्तव्याला होता. त्यावेळी तो फारखांदा हिच्या संपर्कात आला होता. पुढे दोघांमध्ये जवळीक वाढली होती. 2024 मध्ये फारखांदा हिने व्यवसायिकाकडून पैश्यांची मागणी केली असता व्यावसायिकाने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा फारखांदाने त्याला धमकावण्यास सुरुवात केली.
पैसे न दिल्यास दोघांचे मोबाईलवरील चॅट्स सार्वजनिक करण्याची धमकी देऊन फारखांदा हिने पैसे उकळण्याचा आरोप या तरुण उद्योगपतीने केला आहे. सुरुवातीला व्यवसायिकाने 23 लाख आणि त्यानंतर तब्बल 40 लाख दिल्याचे मुंबई पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. एप्रिल २०२४ पासून व्यावसायिकाकडून पैसे उकळणे सुरू असल्याची माहिती आहे. फरखांदा हिचा भाऊ बाझिल हादेखील संबंधित उद्योगपतीला सातत्याने धमकावत होता. तुला जेलमध्ये पाठवेन, अशी धमकी देत होता. पोलिस पुढील तपास करत आहेत.
हनी ट्रॅप! श्रीमंतांना लक्ष्य करून लॉजवर बोलवायची अन् बाथरूममध्ये जाताच…
पुणे! उच्चपदस्थ शासकीय अधिकारी अडकला ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात अन्…
हनी ट्रॅपप्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक…
पुणे जिल्ह्यात इंस्टाग्रामवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन् लॉजवर घेऊन गेला…

