
वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…
पुणे: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप केलेला वाल्मिक कराड आज (मंगळवार) सीआयडीसमोर शरण आला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड तीन आठवड्यांपासून फरार होता. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. त्यामध्ये वाल्मीक कराड याचेही नाव होते. वाल्मीक कराड याचा शोध सीआयडीकडून घेतला जात होता.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव समोर आले. विरोधकांनी सातत्याने कराडवर टीका केली. कराड हा मंत्री मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप करण्यात आला होता. वाल्मिक कराड गेल्या काही दिवसांपासून गायब झाला होता. त्याचा कसून शोध घेतला जात होता. अखेर वाल्मिक कराडने आज शरणागती पत्करली.
संतोष देशमुख आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली होती. तर तीन आरोपी फरार होते. या प्रकरणाचा तपास सीआयडी करत असून गेल्या 4 दिवसांपासून सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. या प्रकरणाचा मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराडचे नाव घेतले जात आहे. सीआयडीने वाल्मिक कराडच्या भोवती तपासाचा फास आवळला होता. संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराडचे नाव घेऊन आरोप होऊ लागले होते. सीआयडीने आपल्या वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयांची कसून चौकशी सुरू केली होती.
संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये बीडमध्ये जवळपास सीआयडीच्या 9 टीम कार्यरत आहेत. टीममध्ये सुमारे दीडशेहून अधिक सीआयडीचे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व टीमने सुमारे 100 हून अधिक लोकांची या प्रकरणांमध्ये आतापर्यंत चौकशी केली. वाल्मिक कराडवर सीआयडीने आपला दबाव वाढवण्यास सुरुवात केली. या प्रकरणातील आरोपींचे बँक खाते गोठवण्यात आले. तर, संपत्ती जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मिक कराड याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत वाल्मिक कराड याने आपण सरेंडर करणार असल्याची माहिती दिली आहे. वाल्मिक कराड याने आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आपला काहीही सहभाग नसल्याचे कराडने स्पष्ट केले. आपल्यावर असलेल्या खंडणीच्या गुन्हा प्रकरणी पाषाण रोड सीआयडीकडे सरेंडर होत असल्याचे वाल्मिक कराड याने व्हिडीओत म्हटले आहे.
खुलेआम फिरत होता कराड…
वाल्मिक कराड याला ताब्यात घेण्यासाठी CID जंगजंग पछाडत होती. 11 डिसेंबर रोजी वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल होता. त्यानंतरही वाल्मिक कराड हा सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असल्याचे दिसून आले. नागपूर हिवाळी अधिवेशनात नागपूरलाही वाल्मिक कराडने काहीजणांना भेटीगाठी घेतल्या होत्या. तरीदेखील कराडकडे कोणाचेही लक्ष गेले नाही.
वाल्मिक कराड याने कधी, कुठं केला प्रवास?
> वाल्मिक कराड हा 9 डिसेंबर रोजी परळीमधून बाहेर पडला.
> 10 आणि 11 डिसेंबर रोजी तो उज्जैनमध्ये दर्शनासाठी मंदिर परिसरात होता. 11 तारखेला त्याने एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.
> 12 डिसेंबर रोजी वाल्मिक कराडने दिवगंत भाजप नेते गोपीनाथ मुंढे यांच्या जयंती निमित्त सोशल मीडियावर पोस्ट केली. त्याचे लोकेशन परळी दाखवण्यात आले.
> 13 डिसेंबर रोजी त्याचे लोकेशन समजून आले नाही.
> 14 डिसेंबरला वाल्मिक कराडने दत्त जयंती निमित्त पोस्ट टाकली
> 15 डिसेंबर रोजी त्याने धनंजय मुंढे आणि पंकजाताई मुंढे यांना मंत्रिपदाबद्दल शुभेच्छा देणारी सोशल मीडियावर पोस्ट केली.
> 16 तारखेला वाल्मिक कराड मध्य प्रदेशातील पेंच अभयारण्य होता. त्यानंतर वाल्मिक कराड गायब झाला.

वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…
संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…
बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…
आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी मारेकरी ताब्यात, हत्येचं गुढ…
भाजप आमदार योगेश टिळेकर हे मामाच्या निर्घृण हत्येनंतर म्हणाले…
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…
भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…
पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…
Video: पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन जीवावर उदार होत अपहरण कर्त्यांची केली सुटका…
पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचे अपहरण करून खून…
पुणे शहरातून अपहरण झालेल्या युवकाचा फिल्मी स्टाईलने केला पोलिसांनी तपास अन्…
पुणे जिल्ह्यातील माजी उपसरपंचाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फेकले पाण्यात…
पुण्यातील घरमालकाचे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या तिघांना बंगालमध्ये अटक

