पुणे शहरात सलूनमध्ये अंदाधुंद गोळीबार; पोलिसांनी जिवाची पर्वा न करता घातली झडप…

पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील वारजे परिसरात शुक्रवारी (ता. २४) रात्री एका सलूनमध्ये अंदाधुंदपणे गोळीबाराची घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी गोळीबार करत असतानाच कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्याला जागेवरच झडप घालून ताब्यात घेतल्याने एक मोठा अनर्थ टळला आहे.

वारजे भागात शुक्रवारी रात्री एका सलूनमध्ये पूर्ववैमनस्यातून एका युवकावर गोळीबार करण्यात आला. आरोपीने बंदुकीतून गोळ्या झाडताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांची पळापळ सुरू झाली. या गोळीबारात एक युवक गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

आरोपी गोळीबार करत असताना पोलीस पथक घटनास्थळाच्या अगदी समोर होते. गोळीबाराचा आवाज येताच आणि आरोपीच्या हातात शस्त्र दिसताच निखिल तांगडे (बक्कल नं. 3592), अमित शेलार (बक्कल नं. 2445) या दोन पोलिसांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आरोपीच्या दिशेने धाव घेतली. आरोपीकडून गोळीबार सुरू असतानाच पोलिसांनी त्याच्यावर झेप घेत त्याला ताब्यात घेतले. निखिल तांगडे (बक्कल नं. 3592), अमित शेलार (बक्कल नं. 2445) या दोन पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे. पोलिसांनी पकडलेल्या आरोपीची चौकशी सुरू असून, हा हल्ला नेमका कोणत्या वादातून झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. गोळीबाराच्या आवाजा मुळे नागरिक सैरावैरा धावत असताना, दुसरीकडे पोलीस आरोपीला पकडण्यासाठी धावत असल्याचे दिसत आहे. वारजे येथील या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पुणे जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास घडली गोळीबाराची घटना अन् १२ तासाच्या आत…

पुणे! जुन्या वादातून गोळीबाराचा थरार! पिस्तूलासह दोघांना अटक…

पुणे-मुंबई महामार्गावरील पहाटेचा सुमारास थरार; पोलिसांवरच गोळीबार…

पुणे! घायवळ टोळीकडून शुल्लक कारणावरून भररस्त्यात एकावर गोळीबार…

Video: पुणे पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या आरोपींची काढली वरात…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!