
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
पुणे: एखादा गंभीर गुन्हा घडल्यानंतर कोणताही ठोस धागादोरा हाती नसताना देखील महाराष्ट्र पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी रात्रंदिवस अथक परिश्रम घेत उत्कृष्ट तपास करतात. आधुनिक तंत्रज्ञान, अनुभव, निरीक्षणशक्ती आणि पोलिसी बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक गुन्हे उघडकीस येतात आणि आरोपींना कायद्याच्या चौकटीत आणले जाते.
पोलिसांच्या अशा उल्लेखनीय आणि प्रेरणादायी तपास कार्यावर आधारित लेखांचे ‘पोलिसकाका’च्या वतीने पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. या पुस्तकामध्ये गुन्ह्याचा तपास करताना आलेल्या अडचणी, वापरलेली कौशल्ये, तपासातील महत्त्वाचे टप्पे तसेच यशस्वी निष्कर्षापर्यंत पोहोचण्याची संपूर्ण प्रक्रिया सविस्तरपणे मांडली जाणार आहे. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट तपास करत गुन्हे उघडकीस आणले आहेत, अशा अधिकाऱ्यांकडून थेट माहिती घेऊन पोलिसकाकाच्या टीमकडून सखोल लेखन करण्यात येणार आहे. निवडक तपास प्रकरणांचा समावेश या पुस्तकात केला जाणार आहे. शिवाय, संबंधित लेखामध्ये उत्कृष्ट तपास करणाऱ्या अधिकाऱ्याचा/कर्मचाऱ्याचे छायाचित्र वापरले जाणार आहे.

या उपक्रमासाठी इच्छुक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलिसकाकाच्या व्हॉट्सॲपवर संपर्क साधून आपल्या गुन्हे तपासाची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निवडक १५ आणि दर्जेदार लेखांना पुस्तकामध्ये स्थान दिले जाणार असून अटी व नियम लागू असणार आहेत.
विशेष म्हणजे, या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असून, पुस्तकात समाविष्ट झालेल्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांचा औपचारिक सन्मान देखील करण्यात येणार आहे. हा उपक्रम पोलिसांच्या कठोर परिश्रमांना योग्य व्यासपीठ देणारा आणि नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
WhatsApp: 93712 69949
policekaka100@gmail.com
View this post on Instagram

