पुणे! लकडी पुलावरील त्या हत्येचा छडा; दोघांना बेड्या, धक्कादायक उलगडा…

पुणे: पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या लकडी पुलाजवळील नदीपात्रात झालेल्या कृषल कसबे याच्या हत्येचे छडा पोलिसांनी लावला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा आणि डेक्कन पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मुख्य आरोपीसह एका अल्पवयीन मुलाला हडपसर परिसरातून ताब्यात घेतले. आरोपी कर्नाटकात पळून जाण्याच्या बेतात असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

गंज पेठ येथील रहिवासी कृषल कसबे (वय ४२) यांचा मृतदेह रविवारी नदीपात्राजवळील मोकळ्या जागेत आढळून आला होता. धारदार चाकूने गळा चिरून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

पोलिसांना तपासादरम्यान संशयित आरोपी हडपसर परिसरात असल्याची माहिती मिळाली. ओंकार कांबळे (वय २७, रा. धनकवडी) आणि त्याचा एक अल्पवयीन साथीदार कर्नाटक राज्यातील गदग येथे पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र, बुधवारी (ता. २२) सायंकाळी पोलिसांनी सापळा रचून त्यांना हडपसरमध्येच पकडले.

प्राथमिक तपासात ही हत्या आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून झाल्याचे समोर आले आहे. मात्र, या हत्येमागे अजून काही जुने वैमनस्य किंवा अन्य काही कारण आहे का, याचा शोध डेक्कन पोलिस घेत आहेत. पोलिस अंमलदार आकाश सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

पुणे शहरातील प्रसिद्ध भिडे पुलाजवळ आढळला युवकाचा मृतदेह…

पुणे! लग्नासाठी चक्क पोलिस अधिकारी झाल्याचा बनाव! इम्प्रेशनसाठी लावले खोटे फ्लेक्स…

पुणे! वकील नवऱ्यासोबत अनैतिक संबंधाच्या संशय; धक्कादायक माहिती समोर…

पुणे हादरलं! प्रवाशाचं रात्रीच्या वेळी महिला कंडक्टरसोबत नको ते कृत्य…

पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर चुलत भावाने केला अत्याचार; गरोदर राहताच…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!