वाल्मिक कराड अडचणीत! संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याची पोलिसांसमोर कबुली…

बीड: सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्या प्रकरणातील विष्णू चाटे याने दिलेल्या माहितीनंतर वाल्मिक कराड याच्या अडचणीत वाढ होणार आहे. खंडणीप्रकरणी अटकेत असलेल्या विष्णू चाटे याने चौकशीत मोठी कबुली दिलेली आहे. वाल्मिक कराडने पवन चक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण केले होते, वाल्मिक कराड याचे अधिकाऱ्यांशी बोलणे झाल्याचे चाटे यानी कबुली दिली आहे. सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात हा मोठा खुलासा केला आहे. विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराड याने धमकी दिल्याची कंपनी अधिकारी यांनी तक्रार दिली होती, कराडने पवचक्की कंपनी अधिकाऱ्यांशी बातचीत केली असल्याचे चाटे याने कबूल केले आहे, त्यामुळे कराडच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

खंडणीप्रकरणी अटकेत असलेल्या विष्णू चाटे याने चौकशीमध्ये कबुली दिलेली आहे. वाल्मिक कराड याने पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांची फोनवरती संभाषण केले होते. वाल्मिक कराड याचे अधिकाऱ्यांशी बोलणं झाले होते, अशी कबुली विष्णू साठे यांनी दिली आहे. सीआयडी न्यायालयामध्ये सादर केलेल्या अहवालामध्ये हा मोठा खुलासा त्यांनी केला आहे, विष्णू चाटेच्या फोनवरून कराडने धमकी दिल्याची कंपनी अधिकारी यांनी तक्रार केली होती, कराड याने कंपनी अधिकाऱ्यांशी बातचीत केले असल्याचा देखील विष्णू साठेने सांगितले आहे. त्यामुळे आता कराडच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

खंडणी प्रकरणांमध्ये वाल्मिक कराड याचा थेट संबंध याद्वारे जोडला गेलेला आहे, पीसीआरसाठीची मागणी केलेली होती, त्या पीसीआरचा रिपोर्ट समोर आला आहे, त्यामध्ये स्पष्टपणे लिहिले आहे. जी खंडणी मागितली होती, ती त्याच्या स्वतःच्या फोनवरून मागितली होती. त्यावेळी तिथे वाल्मिक कराड देखील उपस्थित होता. त्याच्या फोनवरून वाल्मिक कराड याने संबंधित अधिकाऱ्यांना खंडणी मागितली होती, असे स्पष्ट झाले आहे. सीआयडी तपासामध्ये विष्णू चाटे याने तशा प्रकारची माहिती दिली आहे याचा उल्लेख सीआयडीच्या रिपोर्टमध्ये आहे. विष्णू चाटे यांनी दिलेल्या कबुली जबाबमुळे वाल्मिक कराडच्या अडचणी निश्चित वाढणार असल्याचं चित्र आहे. या रिपोर्टनुसार वाल्मिक कराड यानी खंडणी मागितली होती आणि त्यामुळे आता कराड वरती असलेला आरोप काटे यांनी मान्य केल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, विष्णू चाटे हा हत्या आणि खंडणीमधील आरोपी असल्याचे बोलले जात आहे. विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष होता. मात्र पक्षातून त्याचा निलंबन करण्यात आले आहे. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. सरपंच संतोष देशमुख यांचा 9 डिसेंबर रोजी खून झाला होता.

विष्णू चाटे हा केज तालुक्यातील कवडगावचे पूर्वी सरपंच होता. त्यानंतर विष्णू चाटे याला अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष बनवण्यात आले होते. मात्र सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सह आरोपी करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्याला निलंबित करण्यात आले. विष्णू चाटे हा धनंजय मुंडे समर्थक असून तो वाल्मीक कराड यांचा निकटवर्तीय समजला जातो.विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.

santosh-deshmukh-beed

संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे…

वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी…

वाल्मिक कराड प्रवास: घरगडी ते बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र…

वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…

वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…

संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…

बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…

महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी मारेकरी ताब्यात, हत्येचं गुढ…

भाजप आमदार योगेश टिळेकर हे मामाच्या निर्घृण हत्येनंतर म्हणाले…

आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…

भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…

पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…

महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!