
वाल्मिक कराड याच्या कारवाईचा आवळला फास; नेते चौकशीच्या रडारवर…
बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटीकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहे. या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला वाल्मिक कराड याच्याभोवती कारवाईचा फास आवळला जात आहे. वाल्मिक कराड याला साथ देणारे देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे.
सरंपच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या 9 डिसेंबर रोजी करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत 6 जणांना अटक केली असून, एक जण अद्यापही फरार आहे. सीआयडी आणि एसआयटीच्या माध्यमातून जवळपास 150 हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली. तपासाच्या दरम्यान काही महत्त्वाचे धागेदोरेही लागले आहेत. सीआयडीने या हत्या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडभोवती तपासाचा फास आवळला होता. अखेर वाल्मिक कराड याने नाट्यमयरीत्या व्हिडीओ पोस्ट करत शरणागती पत्करली होती.
वाल्मिक कराड हा 31 डिसेंबर 2024 रोजी पुण्यात शरण आला. सीआयडी मुख्यालयात सरेंडर होण्याआधी कराडचा व्हिडीओ समोर आला. त्यात त्याने आपण सीआयडीसमोर सरेंडर होत असल्याचे सांगितले. कराड हा सरेंडर होत असताना त्यावेळी त्याच्यासोबत दोन व्यक्त्ती आणि व्हाईट कलरची एसयूव्ही होती. ही एसयूव्ही कार आता सीआयडीने जप्त केली आहे. सरेंडर होण्यासाठी वाल्मिक कराड हा सीआयडी मुख्यालयात आला तेव्हा त्याच्या कारमध्ये त्याचे समर्थक होते. परळीतील स्थानिक नगरसेवक, नेते, कार्यकर्ते कराडसोबत होते. सीआयडी मुख्यालयात आल्यावर कराडला लागलीच पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, कराडसोबत सरेंडरच्या वेळी असणारे सीआयडीच्या रडावर आले आहेत. कारचा मालक शिवलिंग मोराळे याच्यासह अन्य मदत करणारे लोक देखील सीआयडीच्या रडारवर आहेत. सीआयडी त्यांची देखील कसून चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वाल्मीक कराड याचा आणखी एक कारनामा समोर…
बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 40 खूनाचे तर 191 खुनाचे प्रयत्न…
बीड शहर पोलिस मुख्यालयातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या…
सुदर्शन घुले! मिशी कापली, लघवीला जातो म्हणाला अन् थेट गुजरातला पळाला…
बीड पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…
सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात…
वाल्मिक कराडनंतर आणखी एक मोठा मासा गळाला; पण तो कोण?…
वाल्मिक कराड अडचणीत! संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याची पोलिसांसमोर कबुली…
संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे…
वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी…
वाल्मिक कराड प्रवास: घरगडी ते बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र…
वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…
वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…
संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…
बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…
आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी मारेकरी ताब्यात, हत्येचं गुढ…
भाजप आमदार योगेश टिळेकर हे मामाच्या निर्घृण हत्येनंतर म्हणाले…
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…
भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…
पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

