
वाल्मिक कराड याचा आणखी एक कारनामा समोर, शेतकऱ्यांना लुटले…
सोलापूर : मस्साजोग गावचे (जि. बीड) सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि अवादा कंपनी खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडचे नव नवीन कारनामे समोर येत आहे. वाल्मिक कराडने 140 शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे प्रकरण सोलापूरमधून समोर आले आहे. वाल्मिक कराड सध्या सीआयडी कोठडीत आहे.
सोलापूरसह राज्यातील 140 ऊस तोडणी यंत्र मालकांची 11 कोटी 20 लाख रूपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. ऊस तोडणी यंत्राचे 36 लाख रूपये शासकीय अनुदान मिळवून देतो, असे सांगून वाल्मिक कराड याच्याकडून 140 शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. प्रत्येक ऊस तोडणी यंत्र मालकाला आठ लाख रूपयांचा गंडा घातला आहे. सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यादेवी नगर, सांगली या भागातील ऊस तोडणी यंत्र मालकांची फसवणूक झाली आहे. ऊस तोडणी यंत्र मालक दिलीप नागणे यांनी माहिती दिली आहे. पैशाची पोती भरून मुंबईत पोच केल्याचा नागणे यांचा आरोप आहे.
सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सह्याद्री अतिथी गृहावर स्वतः मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याला भेटल्यानंतर पनवेल येथील देवीश रेसीडेंन्सी येथे आठ लाख रुपये दिल्याचा आरोप नागणे यांनी केला आहे. या शेतकऱ्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतल्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आहे. वाल्मिक कराडचे निकटवर्तीय जितेंद्र पालवे हे पैसे घेतानाचा फोटो समोर आला आहे. पैसे मोजण्यासाठी मशीन सुद्धा वापरली होती. या प्रकरणी नागणे आणि इतर शेतकऱ्यांनी आता पोलीस स्टेशन गाठले आहे, या प्रकरणी तक्रार दाखल करणार आहेत.
दरम्यान, 2017 आणि १८ मध्ये अनुदान देतो म्हणून वाल्मिक कराड याने शासकीय अनुदान मिळवून देतो म्हणून प्रत्येकी ८ लाख रुपये घेतले होते. पण पुढे काही झालंच नाही. आम्ही ४ महिने वाट पाहिली. आम्ही ८ लाख घेतले तर अनुदान कधी देणार अशी विचारणा केली तर आम्हाला बीडमध्ये पैसे घेण्यासाठी बोलावले. त्यावेळी लोकांना हार्वेस्ट मालकांना मारहाण केली. त्या भीतीपोटी आम्ही तिथून पळून आलो. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमची विनंती आहे की आम्हा गोरगरीब शेतकऱ्यांना मदत करावी, आम्ही व्याजाने पैसे काढून दिले आहे. त्यामुळे आमची मदत करावी, अशी मागणीच नागणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सातही आरोपींवर मोक्का…
वाल्मिक कराडनंतर मुलगाही अडचणीत; पिस्तूलाचा धाक दाखवत…
वाल्मिक कराड याच्या कारवाईचा आवळला फास; नेते चौकशीच्या रडारवर…
वाल्मीक कराड याचा आणखी एक कारनामा समोर…
बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 40 खूनाचे तर 191 खुनाचे प्रयत्न…
बीड शहर पोलिस मुख्यालयातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या…
सुदर्शन घुले! मिशी कापली, लघवीला जातो म्हणाला अन् थेट गुजरातला पळाला…
बीड पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…
सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात…
वाल्मिक कराडनंतर आणखी एक मोठा मासा गळाला; पण तो कोण?…
वाल्मिक कराड अडचणीत! संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याची पोलिसांसमोर कबुली…
संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे…
वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी…
वाल्मिक कराड प्रवास: घरगडी ते बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र…
वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…
वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…
संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…
बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…
आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी मारेकरी ताब्यात, हत्येचं गुढ…
भाजप आमदार योगेश टिळेकर हे मामाच्या निर्घृण हत्येनंतर म्हणाले…
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…
भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…
पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

