वाल्मिक कराड प्रवास: घरगडी ते बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र…

बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा संशयित मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराड आज (मंगळवार) पुणे येथील सीआयडी कार्यालयात शरण आला आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा घरगडी असणारा वाल्मिक कराड हा परळी आणि बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र झाला होता.

वाल्मिक कराड हा मूळचा परळी तालुक्यातील पांगरी गोपीनाथ गड गावातील आहे. शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या वाल्मिक कराडच्या घरची आर्थिक नाजूक होती. दहावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर परळी गाठली. जत्रेत सिनेमे दाखवण्यास सुरुवात केली. परळीतून तो व्हीसीआर भाड्याने आणायचा आणि जत्रेत सिनेमे दाखवून पैसे कमावायचा. पैसे कमावण्यासाठी त्याचा संघर्ष सुरू होता. त्याच दरम्यानच्या काळात वाल्मिक कराड हा गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू फुलचंद मुंडे यांच्या संपर्कात आला. फुलचंद मुंडे यांनी वाल्मिकला गोपीनाथ मुंडे यांच्या घरात कामाला ठेवले. मुंडे यांच्या घरात दूध, भाजीपाला, किराणा आणण्याची कामे वाल्मिक कराड करत असे. वाल्मिक कराड हा घरगड्याची सगळी कामे करु लागला. गोपीनाथ मुंडे यांचा त्याने विश्वास संपादन केला.

घरगडी असलेला वाल्मिक कराड पुढे कंत्राटदार झाला. परळीतील औष्णिक वीज केंद्रावर काही कामांची कंत्राटे त्याला मिळू लागली. मोठं नाव सोबत असल्याने त्याचे परळीत नाव होऊ लागले. 1995 च्या सुमारास वैद्यनाथ कॉलेजच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या सर्वसाधारण सभेत राडा झाला. यातच पोलिसाने झाडलेली एक गोळी वाल्मिक कराडच्या पायाला लागली आणि जखमी झाला होता.

गोपीनाथ मुंडे यांचे ज्येष्ठ बंधू पंडित अण्णा मुंडे यांच्या संपर्कात आला. पंडित अण्णांचाही विश्वास त्याने संपादन केला. गोपीनाथ मुंडे यांचा पुतण्या आणि पंडित अण्णा यांचे चिरंजीव धनंजय मुंडे यांच्याशी वाल्मिक कराडची चांगली मैत्री जमली. धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर वाल्मिक कराडने राष्ट्रवादीत प्रवेश केला. धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने वाल्मिक कराडचाही दबदबा तयार झाला. पालकमंत्री धनंजय मुंडे असले तरी कार्यकारी पालकमंत्री वाल्मिक कराड असल्याची चर्चा सुरू झाली. अनेक निर्णय वाल्मिक कराडने घेत असे. बीड जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, खात्यातील अधिकारी, कंत्राटदार कोण असावेत, हे ठरवण्यापर्यंत वाल्मिकची मजल गेल्याची चर्चाही बीडच्या राजकीय वर्तुळात रंगत असे.

santosh-deshmukh-beed

वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…

वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…

संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…

बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…

महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी मारेकरी ताब्यात, हत्येचं गुढ…

भाजप आमदार योगेश टिळेकर हे मामाच्या निर्घृण हत्येनंतर म्हणाले…

आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…

भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…

पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…

महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

Video: पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन जीवावर उदार होत अपहरण कर्त्यांची केली सुटका…

पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचे अपहरण करून खून…

पुणे शहरातून अपहरण झालेल्या युवकाचा फिल्मी स्टाईलने केला पोलिसांनी तपास अन्…

पुणे जिल्ह्यातील माजी उपसरपंचाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फेकले पाण्यात…

पुण्यातील घरमालकाचे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या तिघांना बंगालमध्ये अटक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!