संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे…

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासाला सध्या वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्याप्रमाणे बुधवारी विशेष तपास पथक अर्थात एसआयटी गठित करण्यात आली. या एसआयटी समितीमध्ये 10 जणांचा समावेश आहे. पुणे सीआयडीचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्याकडे या एसआयटी समितीचे नेतृत्त्व देण्यात आले आहे.

एसआयटी पथकात बीड सीआयडीचे पोलिस उपअधीक्षक अनिल गुजर, बीड स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विजयसिंग जोनवाल, बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने, केजचे पोलिस उपनिरीक्षक आनंद शिंदे, बीड स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस उपमहानिरीक्षक तुळशीराम जगताप, पोलिस हवालदार मनोज वाघ, केज पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक चंद्रकांत काळकुट्टे, पोलिस नाईक बाळासाहेब अहंकारे व पोलिस शिपाई संतोष गीते यांचा समावेश आहे.

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येला 24 दिवस उलटल्यानंतरही अद्याप तीन मारेकरी फरार आहेत. वाल्मिक कराड याने 22 दिवसांनी स्वत:हून शरणागती पत्कारली होती. त्यामुळे पोलिस आणि सीआयडीच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

सध्या वाल्मिक कराड पोलिस कोठडीत असून त्याला बीड शहर पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी सध्या वाल्मिक कराड याची कसून चौकशी करत आहेत. वाल्मीक कराड याच्यावर सध्या फक्त पवनचक्की निर्मिती करणाऱ्या कंपनीकडून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल आहे. मात्र, पोलिस कोठडीतील चौकशीनंतर वाल्मिक कराड याच्यावर संतोष देशमुख हत्याप्रकरणात सहभाग असल्याचा गुन्हा दाखल होणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

एसआयटीमधील समावेश…
– आयपीएस अधिकारी डॉ. बसवराज तेली – पोलिस उपमहानिरीक्षक
– अनिल गुजर – पो. उप अधीक्षक
– विजयसिंग शिवलाल जोनवाल- स.पो. निरीक्षक
– महेश विघ्ने – पो.उ.निरीक्षक
– आनंद शंकर शिंदे- पो.उ.निरीक्षक
– तुळशीराम जगताप – सहा. पो. उ. निरीक्षक
– मनोज राजेंद्र वाघ – पोलिस हवालदार
– चंद्रकांत एस.काळकुटे – पोलिस नाईक
– बाळासाहेब देविदास अहंकारे – पोलिस नाईक
– संतोष भगवानराव गित्ते – पोलिस शिपाई

santosh-deshmukh-beed

वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी…

वाल्मिक कराड प्रवास: घरगडी ते बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र…

वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…

वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…

संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…

बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…

महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी मारेकरी ताब्यात, हत्येचं गुढ…

भाजप आमदार योगेश टिळेकर हे मामाच्या निर्घृण हत्येनंतर म्हणाले…

आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…

भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…

पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…

महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!