
भाजप आमदार योगेश टिळेकर हे मामाच्या निर्घृण हत्येनंतर म्हणाले…
पुणे (संदिप कद्रे): विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे सोमवारी (ता. ९) सकाळी अपहरण आणि त्यानंतर हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
या अपहरण आणि हत्या प्रकरणी पुणे पोलिसांनी तपास सुरू केला असून आठ पथकं रवाना झाली आहेत. तर घटनेनंतर आज आमदार योगेश टिळेकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना योगेश टिळेकर म्हणाले, ‘आमच्या मामाचं या जागेवरून अपहरण झाल्यानंतर पोलिसांनी तपास यत्रंणा राबवली. मामाचं अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला, ही दुर्दैवी घटना आमच्या परिवारामध्ये घडली आहे. पोलिस यत्रंणा अतिशय सक्षमपणे काम करत आहे. काल सकाळीपासून, रात्री आणि आज देखील पोलिस या घटनेचा कसून तपास करत आहेत. पोलिस नक्कीच या घटनेचा लवकरात लवकर तपास करतील आणि सुगावा लावतील. खुनाचं कारण काय आहे, आणि ही घटना का घडली हे शोधतील. मी, माझी आई आणि आमचा सर्व परिवार मोठ्या धक्क्यात आहे. पोलिस चांगलं सहकार्य करत आहेत. सर्व यत्रंणा कामाला लागली आहे. आम्हाला आशा आहे गुन्हेगारांना लवकरच अटक होईल आणि त्यांच्यावर कारवाई होईल.’
दरम्यान, सतीश वाघ यांचे सोमवारी सकाळी चालण्यासाठी गेल्यानंतर अपहरण झालं होतं. ते सोलापूर रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. यावेळी चारचाकी गाडी घेऊन 4 अज्ञात व्यक्ती आले. त्यांनी सतीश वाघ यांना जबरदस्ती गाडीत बसवले. सतीश वाघ यांनी त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. सतीश वाघ यांच्या अपहरणाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिस घटनेचा कसून तपास करत आहेत. काल सकाळी सतीश वाघ यांचे अपहरण झाल्यानंतर त्यांच्या मुलाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला होता, मात्र सतीश वाघ आणि त्यांच्या अपहरणकर्त्यांचा मागोवा घेण्यात पोलिसांना यश मिळालेलं नाही. मात्र, सायंकाळच्या सुमारास सतीश वाघ यांचा मृतदेह पुण्यातील शिंदवणे घाटात आढळला. पोलिसांची तपासाची कार्यवाही सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध घेत आहेत.

आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…
भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…
पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…
Video: पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन जीवावर उदार होत अपहरण कर्त्यांची केली सुटका…
पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचे अपहरण करून खून…
पुणे शहरातून अपहरण झालेल्या युवकाचा फिल्मी स्टाईलने केला पोलिसांनी तपास अन्…
पुणे जिल्ह्यातील माजी उपसरपंचाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फेकले पाण्यात…
पुण्यातील घरमालकाचे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या तिघांना बंगालमध्ये अटक

