
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…
बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यामध्ये देशमुख यांचा मृत्यू अतिरक्तस्रावाने झाल्याचे म्हटले आहे. आठ पानांचा हा अहवाल वाचल्यास संतोष देशमुख यांना किती छळ करुन भयंकर क्रूर पद्धतीने मारण्यात आले, याची कल्पना येऊ शकते. आरोग्य विभागाने संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल सीआयडीकडे सुपूर्द केला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबरला अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात विष्णू चाटे याच्यासह चौघांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. अद्याप तीन आरोपी फरार आहेत. विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्या जवळचा माणूस असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. भाजपचे आमदार सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा अंगावर काटा आणणारा तपशील विधानसभेत मांडला होता.
शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे की, ‘संतोष देशमुख यांना जबर मारहाण करण्यात आली. त्यांच्या अंगावर विविध ठिकाणी मुका मार दिल्याने अतिरक्तस्राव झाला आहे. त्यामुळे ते शॉकमध्ये गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.’ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अहवालात संतोष देशमुख यांच्या मृत्यूचे कारण ‘हॅमरेज अॅण्ड शॉक ड्यू टू मल्टिपल इन्जुरिज’ असे नमूद करण्यात आले आहे. देशमुख यांच्या छातीवर, हात-पाय, चेहरा, डोके या भागात मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्याचा भाग मारहाणीमुळे काळा-निळा पडला होता. त्यामुळे मारेकऱ्यांनी संतोष देशमुख यांचे डोळे जाळून टाकल्याची चर्चा आहे.’
दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणात आतापर्यंत जयराम चाटे, महेश केदार, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे यांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे यांना पोलिसांनी अटक केली आहे. विष्णू चाटेला पोलिसांनी बुधवारी बीड शहराजवळ ताब्यात घेतले होते. विष्णू चाटे हा वाल्मिक कराड यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता याप्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…
आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी मारेकरी ताब्यात, हत्येचं गुढ…
भाजप आमदार योगेश टिळेकर हे मामाच्या निर्घृण हत्येनंतर म्हणाले…
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…
भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…
पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…
Video: पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन जीवावर उदार होत अपहरण कर्त्यांची केली सुटका…
पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचे अपहरण करून खून…
पुणे शहरातून अपहरण झालेल्या युवकाचा फिल्मी स्टाईलने केला पोलिसांनी तपास अन्…
पुणे जिल्ह्यातील माजी उपसरपंचाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फेकले पाण्यात…
पुण्यातील घरमालकाचे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या तिघांना बंगालमध्ये अटक

