
वाल्मिक कराडनंतर आणखी एक मोठा मासा गळाला; पण तो कोण?…
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलीसांचा तपास सुरू आहे. मुख्य आरोपी वाल्मिक कराडने सीआयडीसमोर सरेंडर केले होते. पोलिसांनी आणखी एका मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे असे तीन आरोपी फरार होते. त्यांच्या मागावर देशभर पोलीस पथकं रवाना झाली होती. आता यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. आता आरोपी कोण आहे? याबाबत पोलिसांकडून गुप्तता पाळली जात आहे. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे किंवा सुधीर सांगळे यांच्यापैकी एकजण हा आरोपी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आरोपीला पोलिसांनी पुण्यातून अटक केल्याची माहिती आहे.
वाल्मिक कराड सध्या सीआयडी कोठडीत आहे. वाल्मिक कराडने कोर्टाकडे अर्ज करत खास सुविधेची मागणी केली होती. पण, न्यायालयाने मागणी फेटाळली आहे. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याने कोर्टाकडे आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत तुरुंगात 24 तास मदतनीसाची मागणी केली आहे. वाल्मिक कराडने आपल्या आजारपणाचे कारण देत ही मागणी केली आहे. वाल्मिक कराड याने आपल्यासाठी मदतनीस कोण असावा, याचे नावही कोर्टाला दिले होते. वाल्मिक कराडच्या विनंती अर्जावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी आपला निकाल सुनावला आहे.
वाल्मिक कराड याच्या अर्जावर न्यायालयाने केवळ शासकीय व्यक्तीकडून सुविधा मिळणार असल्याचे स्पष्ट केले. आपल्याला स्लीप ॲपनिया नावाचा आजार झाला असल्याचा दावा वाल्मिक कराड याने आपल्या अर्जात केला होता. याच आजारातील उपचाराचा एक भाग म्हणून खाजगी व्यक्ती काळजीवाहू म्हणून देण्याची विनंती केली होती. या आजारातील उपचारासाठी सी पॅप मशीन चालवण्यासाठी खासगी मदतनीस देण्याची मागणी केली होती. मात्र, कोठडीत असल्याने खासगी व्यक्तीचा वापर करता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. फक्त शासकीय सुविधा देण्याची सूचना न्यायालयाने केली.

वाल्मिक कराड अडचणीत! संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याची पोलिसांसमोर कबुली…
संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे…
वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी…
वाल्मिक कराड प्रवास: घरगडी ते बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र…
वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…
वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…
संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…
बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…
आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी मारेकरी ताब्यात, हत्येचं गुढ…
भाजप आमदार योगेश टिळेकर हे मामाच्या निर्घृण हत्येनंतर म्हणाले…
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…
भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…
पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

