भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…

पुणे : भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ (वय ५५) यांचे आज (सोमवार) पहाटेच्या सुमारास अपहरण करण्यात आले होते. यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सतीश वाघ हे मांजरी परिसरात राहण्यासाठी आहेत. आज पहाटेच्या सुमारास ते मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडले होते. घरापासून काही अंतरावर जातात दबा धरून बसलेल्या चार जणांनी त्यांना जबरदस्तीने एका चार चाकी गाडीत बसवले आणि अपहरण करून घेऊन गेले होते. यानंतर हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

आज संध्याकाळी ग्रामीण पोलिसांना यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीत वाघ यांचा मृतदेह आढळून आला आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी बातमीला दुजोरा दिला आहे. सकाळपासून पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम वाघ यांचा शोध घेत होते. खुद्द अमितेश कुमार हे हडपसर पोलिस स्टेशनमध्ये दिवसभर बसून होते. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. पण दिवसभरात वाघ यांचा काहीच ठिकाणा लागला नाही. संध्याकाळी ग्रामीण पोलिसांना वाघ यांचा मृतदेह आढळून आला. वाघ यांचे अपहरण का करण्यात आले, त्यांची अपहरणकर्त्यांनी हत्या का केली, याचे गुढं वाढले आहे. हत्येमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

दरम्यान, सतीश वाघ हे शेतकरी होते. वाघ यांचे अपहरण करताना एका व्हिडीओ समोर आला आहे. एका गाडीत चौघे जण असल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली. ही गाडी सोलापुरच्या दिशेने गेली असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले होते. वाघ यांच्या मुलाने अपहरणाची तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी हडपसर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…

Video: पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन जीवावर उदार होत अपहरण कर्त्यांची केली सुटका…

पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचे अपहरण करून खून…

पुणे शहरातून अपहरण झालेल्या युवकाचा फिल्मी स्टाईलने केला पोलिसांनी तपास अन्…

पुणे जिल्ह्यातील माजी उपसरपंचाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फेकले पाण्यात…

पुण्यातील घरमालकाचे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या तिघांना बंगालमध्ये अटक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!