धक्कादायक! MBBS युवतीची नदीत उडी घेऊन आत्महत्या…

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात एमबीबीएस युवतीने वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ईशा बिंजवे (वय २४) असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.

ब्रम्हपुरी शहरातील रहिवासी असलेल्या ईशाने संध्याकाळच्या दरम्यान चंद्रपूर-गडचिरोली सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीत उडी घेतली. मात्र नदीत ज्या ठिकाणी उडी घेतली त्या ठिकाणी पाणी कमी असल्याने तिचा पहिला प्रयत्न फसला. यानंतर तिने जास्त खोल पाणी असलेल्या ठिकाणी पुन्हा उडी घेतली. पिंपळगाव जवळच्या नदी पात्रात मृतदेह आढळून आला आहे.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

ईशाचे आई-वडील दोन्ही होमियोपॅथी डॉक्टर असून ब्रम्हपुरी शहरात त्यांचा दवाखाना आहे. पुलावरून जाणाऱ्या अनेक लोकांनी ही घटना मोबाईल मध्ये शूट केली. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ईशा स्कुटीने वैनगंगा नदीच्या वडसा येथे असलेल्या पुलावर आली होती. त्यानंतर दुचाकी उभी करून चपला काढल्या आणि नदीत उडी मारली. पात्रात पाणी कमी असल्याने प्रथम ती वाचली. पण नंतर ती जास्त पाणी असलेल्या ठिकाणी गेली. तिचा यावेळी व्हिडीओही अनेकांनी काढला. मात्र, कोणीही वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. वैनगंगा नदीच्या नीरज गावाजवळील पात्रात तिचा मृतदेह आढळून आला आहे. तिच्या मृत्युमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मुंबईतील रिलस्टार युवतीचा धबधब्याजवळ तोल जाऊन मृत्यू…

धक्कादायक! मित्रांसोबत मस्करी करणे बेतले महिलेच्या जीवावर…

धावत्या कारमध्ये प्रेमीयुगलाचे अश्लील चाळे अन् पोलिसांची कारवाई…

मुंबईत व्हॉट्सऍप चॅटींगवरून युवतीची समुद्रात उडी घेऊन आत्महत्या…

हृदयद्रावक! बापलेकाने एकमेकांना घट्ट मिठी मारून रेल्वेखाली केली आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!