
पुणे शहरातील नवले पुलाजवळ भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; पाहा जखमींची नावे…
पुणे: पुणे शहरातील नवले पुलावर आज (शनिवार) पहाटे झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू आहे. स्विफ्ट कारने उभ्या असलेल्या बसला पाठी मागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची घटना घडताच आसपासच्या लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये अडकलेल्या तरुणांची सुटका केली. तसेच घटनेची माहिती पोलिसांना दिली.
बाह्यवळण महामार्गावर वडगाव ब्रिजजवळ थांबलेल्या बसला मागून येणाऱ्या स्विफ्ट कारने आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास जोरदार धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे. वाढदिवसाची पार्टीवरून परतत असलेल्या या कारमधील सहापैकी दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कारमधील इतर तरूणांना अपघातानंतर आधी नवले हॉस्पिटल व नंतर पुढील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास एक मोठी बस रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली होती. पहाटे पाचच्या सुमारास एमएच 12 केडब्ल्यू 3663 ही स्विफ्ट कार नवले पुलावर भरधाव आली आणि या बसला मागून जोरात धडक दिली. कारचा वेग इतका होता की, कारचा पुढचा भागाचा चुराडा झाला आहे. या कारमधून प्रवास करणारे युवक हे वाढदिवसाची पार्टी करून परतत होते. कारमधील सहा जणांपैकी दोन जणांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. तर इतर चार जण जखमी झाले. तेथील नागरिकांनी आणि प्रवाशांनी उपचारांसाठी या चार जखमी युवकांना आधी नवले हॉस्पिटलमध्ये दाखल केले, त्यानंतर पुढे त्यांना एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
जखमींची नावे-
सोहम खळे-वय 19
आयुष काटे- वय 20
अथर्व झेडगे-वय 19
प्रतीक बंडगर-वय 19
हर्ष वरे- वय 19
Video: पुणे-बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोघांचा मृत्यू तर…
नवले पुलावर ट्रकला भीषण अपघात; चार जणांचा होरपळून मृत्यू…
जळगाव रेल्वे अपघातात ११ जणांचा मृत्यू; केवळ अफवा ठरले कारण…
भीषण अपघात! पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तीन युवकांना एसटी बसने चिरडले…
पुणे-नाशिक मार्गावर भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू…

