लग्न जमवत नसल्याने मुलाने घेतला अपंग वडिलांचा जीव…
पंढरपूर: लग्न जमवत नसल्याने एका मुलाने वडिलांच्या डोक्यात फरशी घालून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना पंढरपूर शहरामध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिरसरात खळबळ उडाली आहे. गोपिचंद उर्फ जितू हुकुम कदम (वय 28, रा. भगवान नगर, पंढरपूर) असे मुलाचे तर हुकुम माणीक कदम (वय 58) असे मृत्युमुखी पडलेल्या वडिलांचे नाव आहे. मुलाने रागाच्या भरात पित्याच्या डोक्यात […]
अधिक वाचा...वाघोलीमध्ये रिक्षा चोरणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात…
पुणे (संदीप कद्रे): वाघोलीमधे रिक्षा चोरणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला युनिट ६ने ताब्यात घेतले आहे. पुढील तपास लोणीकंद पोलिस हे करीत आहेत. युनिट 6 कडील पोलिस अधिकारी व अंमलदार हे वाघोली गावचे हद्दीत 22/08/2023 रोजी पेट्रोलिंग करीत होते. पो अं 2688 ऋषिकेश व्यवहारे यांना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, एका अल्पवयीन मुलाकडे चोरीची रिक्षा असून तो […]
अधिक वाचा...युवतीची फसणवूक करणाऱ्यास सायबर पोलिसांनी घातल्या बेड्या…
वर्धा (उमेशसिंग सुर्यवंशी): युवतीची फसणवूक करणाऱ्यास सायबर पोलिसांनी घातल्या बेड्या घातल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. चित्रीका सुभदर्शनी सुधांशु पानीग्रही (वय 28, व्यवसाय-सिनी. लेक्चरर, रा. रावत रेसीडंन्सी, सावंगी, मेघे) यांना आरोपी मो.क्र. धारकाने फेडेक्स नावाचे कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगून त्यांचे नावाचे पार्सल मध्ये 02 किलो कपडा, 5 पासपोर्ट, 6 क्रेडीट कार्ड व 140 […]
अधिक वाचा...लहान भावानेच केला मोठ्या भावाचा खून; कारण आले पुढे…
बीडः लहान भावानेच आपल्या मोठ्या भावाचा खून केल्याची घटना घडली आहे. मनोहर विलास पुंड (वय 36, रा. रंगार चौक, गेवराई) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून, दर्शन पुंड असे खून करणाऱ्या लहान भावाचे नाव आहे. गेवराई शहरापासून जवळच असलेल्या बागवान कब्रस्तानजवळ एका युवकाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. त्याच मृतदेहाची उत्तरे तपासणी केल्यानंतर त्याचा खून […]
अधिक वाचा...आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल…
हिंगोली : शिंदे गटाचे आमदार आमदार संतोष बांगर यांनी हातात नंगी तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी फिरवल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोलीत आयोजित करण्यात आलेल्या कावड यात्रेदरम्यान आमदार बांगर यांनी ही तलवार हातात घेऊन फिरवली होती. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आमदार संतोष बांगर हे नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि प्रकरणामुळे […]
अधिक वाचा...भारतातून एक महिला प्रियकरासाठी सौदीला पळाली अन् आता…
औरंगाबाद : पाकिस्तानमधून भारतात आलेली सीमा हैदर आणि भारतातून पाकिस्तानमध्ये गेलेली अंजूचे प्रेम प्रकरण गाजत असताना आता औरंगाबादच्या आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. औरंगाबाद शहरातील एक महिला थेट सौदीला पळून गेल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे विदेशात गेल्यावर ती देशविघातक कृत्यात सहभागी झाल्याचा एक मेल औरंगाबाद पोलिसांना प्राप्त झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. औरंगाबाद शहरातील […]
अधिक वाचा...प्रेमात अडसर ठरत असल्याने चिमुकल्याचा खून करून मृतदेह अक्षरशः फेकला…
सोलापूर : प्रेमात अडसर ठरत असल्याने प्रियकरासोबत तिच्या आईनेच पोटच्या चार वर्षीय मुलाचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना मोडलिंब (ता. माढा) येथे घडली आहे. या घटनेमुळे संतापासह परिसरात खळबळ उडाली आहे. मोडलिंब येथे राहणाऱ्या आई आणि तिच्या प्रियकराने प्रेमात अडथळा ठरणाऱ्या चार वर्षाच्या चुटक्या नावाच्या मुलाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह पुरंदर […]
अधिक वाचा...राखी बांधण्यासाठी मला भाऊ हवा; वडिलांच्या डोळ्यात अश्रू अन् पोलिस…
नवी दिल्ली: मुलीने वडिलांकडे एक अजब मागणी केली होती. मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी वडिलांनी मध्यरात्रीच्या सुमारास चिमुकल्याची चोरी केली. पोलिसांनी शोध घेत गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीमधील टागोर गार्डनच्या रघुबीर नगरमध्ये राहणारे संजय गुप्ता (वय 41) आणि अनिता गुप्ता (वय 36) यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. मात्र, एक दिवशी मुलाचा मृत्यू झाला. यामुळे […]
अधिक वाचा...पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे कार्य कौतुकास्पद: पद्मश्री कल्याण सिंह रावत
धाराशिव (प्रतिक भोसले): धाराशिव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करुन जिल्ह्यात वृक्ष चळवळ राबवत आहेत. वृक्षलागवड आणि संवर्धन करून जनजागृती करत एक हरितक्रांतीची चळवळ गतिमान केल्याबद्दल त्यांचा शनिवारी (ता. २६) पद्मश्री कल्याण सिंह रावत (देहरादून) प्रमुख मैती आंदोलन (माहेर वृक्ष चळवळ), उत्तराखंड यांच्या हस्ते ‘वृक्ष निधी सन्मान पत्र’ देऊन सत्कार […]
अधिक वाचा...रस्त्याच्या कडेला नातेवाईकाशी बोलण्यासाठी थांबले अन् घात झाला…
भंडारा: दुचाकीस्वार पती-पत्नी रस्त्याच्या कडेला वाहन लावून नातेवाईकांसोबत बोलत होते. यावेळी भरधाव ट्रकने पती-पत्नीला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बालचंद ठोंबरे (वय 55), वनिता ठोंबरे (वय 50, रा. वरठी) असे ट्रकच्या धडकेत ठार झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. तुमसर-मोहाडी राज्य मार्गावरील खरबी परिसरात हा अपघात झाला आहे. दुचाकीस्वार पती-पत्नी आपल्या एका नातेवाईकाशी बोलण्यासाठी थांबले. त्यांनी रस्त्याच्या […]
अधिक वाचा...
