लहान भावानेच केला मोठ्या भावाचा खून; कारण आले पुढे…

बीडः लहान भावानेच आपल्या मोठ्या भावाचा खून केल्याची घटना घडली आहे. मनोहर विलास पुंड (वय 36, रा. रंगार चौक, गेवराई) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून, दर्शन पुंड असे खून करणाऱ्या लहान भावाचे नाव आहे.

गेवराई शहरापासून जवळच असलेल्या बागवान कब्रस्तानजवळ एका युवकाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. त्याच मृतदेहाची उत्तरे तपासणी केल्यानंतर त्याचा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपीला अटक केली आहे. गेवराई शहरापासून जवळच असलेल्या बागवान कब्रस्तान परिसरामध्ये एका पत्राच्या शेडमध्ये दर्शन पुंड आणि त्याचा मित्र आनंद बाबते यांच्यासह अन्य तीन साक्षीदारांनी मनोहर पुंड याला जबर मारहाण केली. त्यानंतर त्याचा खून केला. मनोहर याचा खून करुन हे सर्वजण घरी परतले. त्यानंतर या परिसरात मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या मृतदेहाची ओळख पटवत तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवला होता. त्या उत्तरीय तपासात मनोहर याचा खून झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले आणि अवघ्या तीन तासांत खून करणाऱ्या आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

मनोहर पुंड हा अनेकांकडून पैसे घ्यायचा आणि दारु पिऊन घरी त्रास द्यायचा. मनोहरच्या या सर्व रोजच्या त्रासाला दर्शन कंटाळला होता. त्यामुळे दर्शन पुंड याने आपल्या मित्राच्या सहाय्याने मनोहर याला जबर मारहाण केली. यामध्येच त्याचा मृत्यू झाल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. याप्रकरणी दर्शन पुंडच्या विरोधात गेवराई पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी फिर्याद नोंदवण्यासाठी जवाब दे म्हटले तरी तो नकार देऊ लागल्याने पोलिसांना दर्शन पुंड याच्यावर संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता आपणच मित्रांच्या मदतीने मनोहरला मारहाण करुन हत्या केल्याची कबुली दिली. तर, माझा भावाने अनेक लोकांकडून पैसे घेतले होते. तसेच तो दारु पिऊन घरी येऊन नेहमी त्रास देत असे, यालाच वैतागून मी याची माहिती आरोपी माऊली आनंद बाप्ते (वय 30 रा. रंगार चौक) याला सांगितले. त्यानुसार माऊली याने त्याच्या अन्य तीन साथीदारांच्या मदतीने मनोहर याला बागवान कब्रस्थान परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये घेऊन जात अमानुष मारहाण करुन जीवे मारल्याची कबुली आरोपी दर्शनने दिली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! क्षणभर छोट्या भावाला काहीच उमगलंच नाही…

सख्ख्या भावाकडून अल्पवयीन बहिण राहिली गरोदर…

करुणा शर्मा यांच्या मोटारीवर मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला अन्…

मित्राने धमकी देत लहानपणीच्या मैत्रीणीवर केला बलात्कार…

लातूरमध्ये भीषण अपघातात न्यायाधीशांचा जागीच मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!