दिल्लीत महिलेवर हात उचलणाऱ्या DCP संदीप लांबा यांच्यावर सरकारकडून कारवाई…

नवी दिल्ली : दिल्लीच्या ऐतिहासिक जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलीस अधिकाऱ्याने एका महिलेला मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारे अधिकारी दिल्ली पोलीस दलातील अतिरिक्त पोलीस उपआयुक्त संदीप लांबा असल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. नेटिझन्सनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्यानंतर संदीप लांबा यांच्यावर सरकारकडून कारवाई करण्यात आली आहे.

‘कॉकरेच जनता पार्टी’ संघटनेतर्फे जंतर-मंतर ते संसदेपर्यंत ‘संसद चलो’ मोर्चा काढण्याचे २० जुलै रोजी नियोजित होते. मोठ्या संख्येने जमलेल्या आंदोलनकर्त्यांना संसदेकडे जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. या दरम्यान पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. याच गोंधळात डीसीपी संदीप लांबा यांनी एका महिलेवर हाच उचलला. तिच्या तोंडावर मारल्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

जनक्षोभ आणि सोशल मीडियावरील प्रचंड दबावानंतर दिल्ली पोलिसांनी संदीप लांबा यांना जंतर-मंतर येथील विशेष आंदोलनाच्या ड्युटीवरून हटवून त्यांच्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी परत पाठवले आहे. पोलिसांनी ही कारवाई केली असली, तरी या संदर्भात अद्याप दिल्ली पोलीस दलाकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण जारी करण्यात आलेले नाही.

दरम्यान, संबंधित प्रकरण केवळ सोशल मीडियापुरते मर्यादित न राहता आता दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचले आहे. वरिष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन यांनी न्यायालयात या व्हायरल व्हिडिओचा संदर्भ दिला. व्हिडिओमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी संदीप लांबा हे महिला आंदोलनकर्त्यावर थेट हात उचलताना दिसत आहेत. या अधिकाऱ्याची आणि पोलीस प्रशासनाची उत्तरदायित्व ठरवणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला. उच्च न्यायालयाने या संपूर्ण घटनेची गंभीर दखल घेत दिल्ली पोलिसांना या प्रकरणी उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, घटनेशी संबंधित सर्व CCTV फुटेज आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवण्याचे कडक निर्देश दिले आहेत.

संदीप लांबा हे DANIPS (दिल्ली, अंदमान आणि निकोबार बेटे पोलीस सेवा) केडरचे वरिष्ठ अधिकारी आहेत. सध्या ते दिल्ली पोलिसांत अतिरिक्त पोलीस उपआयुक्त म्हणून उत्तर-पूर्व जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित अनेक संवेदनशील आणि महत्त्वाच्या प्रकरणांची जबाबदारी सांभाळलेली आहे.

महिला IPSचे अश्लील Video काढून पतीला पाठवल्याचा गंभीर आरोप अन् आत्महत्येचा प्रयत्न…

महाराष्ट्राचे सुपूत्र IPS विनायक भोसले यांच्या उत्तर प्रदेशात धडाकेबाज कारवाया…

Video! पोलिस अधिकारी IPS अमिताभ गुप्ता यांची विशेष मुलाखत…

पुणे! PSIचा कॅफेमधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निलंबन; अन् आता…

DCP आणि ACP दर्जाच्या दोन महिला पोलिस अधिकारी अशोक खरातच्या संपर्कात…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!