युवतीची फसणवूक करणाऱ्यास सायबर पोलिसांनी घातल्या बेड्या…

वर्धा (उमेशसिंग सुर्यवंशी): युवतीची फसणवूक करणाऱ्यास सायबर पोलिसांनी घातल्या बेड्या घातल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

चित्रीका सुभदर्शनी सुधांशु पानीग्रही (वय 28, व्यवसाय-सिनी. लेक्चरर, रा. रावत रेसीडंन्सी, सावंगी, मेघे) यांना आरोपी मो.क्र. धारकाने फेडेक्स नावाचे कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगून त्यांचे नावाचे पार्सल मध्ये 02 किलो कपडा, 5 पासपोर्ट, 6 क्रेडीट कार्ड व 140 ग्रॅम एम.डी. हे अंमली पदार्थ पकडले असल्याचे सांगितले. त्याकरीता 16,250/- रूपये त्यांच्या आय.डी. वरून पाठविले असे सांगुन मुंबई पोलिस सायबर क्राईम या नावाने स्काईप वरून कॉल करून भिती दाखवली. 2,47,776 रुपये ऑनलाईन वळते करण्यास भाग पाडून फसवणुक केली. अशा फिर्यादींचे लेखी तक्रारीवरून सायबर पोलिस स्टेशन, वर्धा येथे 27.06.2023 रोजी अप क्र 01/23 कलम 419,420 भा.द.वि. सह कलम 66(ड) माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा तांत्रीक पध्दतीने तपास करून गुन्हयात आरोपी अंबादास जनार्धन कांबळे, (रा. नांदेड) व अनिल संभाजी पाटील (रा. औरंगाबाद) यांना 18.08.2023 रोजी गुन्हयात अटक करण्यात आली होती. सदर गुन्हयाचे पुढील तपासात तांत्रीक विश्लेषनावरुन प्राप्त माहितीचे आधारे गुन्हयाचे तपास कामी पथक सुरत (गुजरात) येथे रवाना करण्यात आले होते. सदर ठिकाणी तपास करून गुन्हयात आरोपी 01) अजय दत्तु पाटील, रा. सुरत, (गुजरात) 02) पृथ्वीश शिवाभाई मावाणी, वय 21, रा. सुरत (गुजरात) यांना दि. 26.08.2023 रोजी गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्या ताब्यातून 05 मोबाइल व इतर याप्रमाणे एकूण 80,000/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपींची 30.08.2023 पावेतो पोलिस कस्टडी रिमांड प्राप्त असून, गुन्हयाचा पुढील तपास सुरू आहे. गुन्हयात आणखी आरोपी पुढे येण्याची शक्यता आहे.

सदर गुन्हयाचा तपास नूरूल हसन, पोलिस अधीक्षक , सागर कवडे, अपर पोलिस अधीक्षक यांचे मार्गदर्षनात कांचन पांडे, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस स्टेशन, वर्धा, पोलिस अंमलदार पो.हवा./ वैभव कट्टोजवार, निलेष तेलरांधे, रणजित जाधव, पो.ना./अनुप राऊत, अमित शुक्ला, अनुप कावळे, लेखा राठोड, प्रतिक वांदीले यांनी केली.

वर्धा सायबर पोलिस स्टेशन मार्फत फसवणुकीचा गुन्हा उघड…

सायबर फ्रॉड आणि जामतारा एक सत्य…

वर्धा पोलिसांना सर्वोत्कृष्ट गुणात्मक अन्वेषणासाठीचे बक्षिस…

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!