लग्न जमवत नसल्याने मुलाने घेतला अपंग वडिलांचा जीव…
पंढरपूर: लग्न जमवत नसल्याने एका मुलाने वडिलांच्या डोक्यात फरशी घालून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना पंढरपूर शहरामध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिरसरात खळबळ उडाली आहे.
गोपिचंद उर्फ जितू हुकुम कदम (वय 28, रा. भगवान नगर, पंढरपूर) असे मुलाचे तर हुकुम माणीक कदम (वय 58) असे मृत्युमुखी पडलेल्या वडिलांचे नाव आहे. मुलाने रागाच्या भरात पित्याच्या डोक्यात फरशी घातली. या घटनेत वडील गंभीर जखमी झाले. त्यानंतर मुलानेच वडिलांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र या घटनेत गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा उपचारा दरम्यान सोमवारी (ता. २८) रात्री साडेसातच्या सुमारास मृत्यू झाला आहे. दुर्दैवाने यात मृत्यू झालेले वडील हे दोन्ही पायानी अपंग होते.
गोपिचंद हा गेल्या काही दिवसांपासून लग्नासाठी हट्ट करत होता. माझं लग्न करून द्या, असे म्हणत तो कित्येक दिवसांपासून वडिलांच्या मागे लागला होता. कदम कुटुंब अत्यंत गरीब आहे. मोठा मुलगा कापड दुकानात काम करतो, तर आरोपीची आई धुणंभांड्याची काम करते. हत्या केलेला गोपीचंद हा बेरोजगार होता. शिक्षण देखील न झाल्यामुळे त्याने काही दिवसांपूर्वी एक वेल्डिंगचं दुकान काढले होते. मात्र याही ठिकाणी तो काम करत नव्हता.
अपंगत्वामुळे घरीच असणाऱ्या वडिलांच्या मागे या धाकट्या मुलाने लग्नाचा तकादा लावला होता. वडिलांनी यास विरोध केल्याने संतप्त झालेल्या गोपीचंद याने रविवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास वडील हुकुम कदम यांना “तू माझं लग्न करत नाही, तुला आता ठेवत नाही”, असे म्हणून शिवागाळ आणि मारहाण केली. मारहाणीत हुकुम गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, उपचारादरम्यान वडील हुकूम कदम यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणात मुलाच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश भुजबळ करीत आहेत.
लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने युवकाने उचलले धक्कादायक पाऊल…
नवऱ्याचे दुसरं लग्न सुरू असतानाच पत्नी मुलाला घेऊन पोहोचली लग्न मंडपात अन्…
प्रेमविवाह ठरला अन् लग्नाच्या दिवशी नवरदेवाने ठोकली मेहुणीसोबत धूम…
नवविवाहितेच्या अपहरण प्रकरणाला लागले वेगळे वळण…
नवविवाहीत दाम्पत्याची आत्महत्या; सुसाईड नोट मध्ये लिहीले…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…