पुणे शहरात देशी गावठी कट्टा बाळगणारा अडकला पोलिसांच्या ताब्यात…
पुणे (संदीप कद्रे): बेकायदेशीर देशी गावठी कट्टा (अग्निशस्त्र) व ०५ जिवंत काडतुसे बाळगणारे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार बिबवेवाडी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
सदरबाबत अधिक माहिती अशी की, २०/०८/२०२३ रोजी बिबवेवाडी पोलिस स्टेशन कडील तपास पथकातील सहा. पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे व तपास पथकातील अमंलदार असे पोलिस स्टेशन हंधीत वरिष्ठांचे आदेशाने कोम्बींग ऑपरेशन राबवित असताना सहा.पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, हिरामन बनकर शाळे समोर एक लांब केस व दाढी असलेला युवक उभा असून त्याने काळे रंगाची कान टोपी व काळे रंगाचा फुल शर्ट व पॅन्ट घातलेले आहे. त्याच्याकडे एक गावठी बनावटीचा पिस्टल सदृश्य हत्यार कमरेला लावलेले आहे, अशी बातमी बातमीदारांमार्फत मिळाली होती.
पोलिस अंमलदार व पंच यांनी घटनास्थळी जावून अक्षय संजय शिवशरण (वय २५ वर्षे, रा. बनकर शाळेजवळ, ढमाले -कॉमप्लेक्स्, फ्लॅट नं. ४८, सुखसागरनगर, कात्रज, पुणे) यास ताब्यात घेवुन त्याची पंचासमक्ष अंगझडती घेता त्याचेकडे २५,०००/- रुपये किंमतीचे एक लोखंडी धातुचे गावठी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र) व ५०००/- रुपये किंमतीचे ०५ जिवंत काडतुस मिळून आले आहे. त्याच्याविरुध्द पोलिस अंमलदार शिवाजी येवले यांनी बिबवेवाडी पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने तो बिबवेवाडी पोलिस स्टेशन गुन्हा रजि.नं. १६९/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) सह महाराष्ट्र पोलिस – अधिनीयम कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करुन आरोपीना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
आरोपीकडे अग्निशस्त्र व ०५ जिवंत काडतुसांबाबत तपास करता त्याने ज्याच्याकडून अग्निशस्त्र विकत घेतलेले आहे. तो आरोपी मनोज छगन भागवत (वय ३० वर्षे रा.मु.पो.सावळगांव ता. कोपरगांव, जि. अहमदनगर) यास विक्रोळी मुंबई येथून ताब्यात घेवून गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. नमुद दोन्ही आरोपीविरूध्द गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई ही परिमंडळ ०५ चे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, वानवडी विभागाचे सहा. पोलिस आयुक्त मा.शाहुराज साळवे, बिबवेवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सविता ढमढेरे, पोलिस निरीक्षक गुन्हे संजयकुमार पंतगे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा.पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलिस अमंलदार शाम लोहोमकर, तानाजी सागर, शिवाजी येवले, अभिषेक धुमाळ,प्रणय पाटील, सतिष मोरे यांनी केली आहे.
बिबवेवाडी पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्यास २४ तासाच्या आत केली अटक…
Video: पुणे शहरातील कोयता गॅंगच्या दहशतीचा व्हिडीओ व्हायरल…
पुणे शहरात पत्नीची हत्या करून पोलिसांसमोर आत्मसमर्पण…
पुणे शहरातील चिक्यासह त्याच्या दोन साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई…
पुणे शहरातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; परदेशी युवतींची सुटका…
Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…
Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…