वाघोलीमध्ये रिक्षा चोरणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात…

पुणे (संदीप कद्रे): वाघोलीमधे रिक्षा चोरणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला युनिट ६ने ताब्यात घेतले आहे. पुढील तपास लोणीकंद पोलिस हे करीत आहेत.

युनिट 6 कडील पोलिस अधिकारी व अंमलदार हे वाघोली गावचे हद्दीत 22/08/2023 रोजी पेट्रोलिंग करीत होते. पो अं 2688 ऋषिकेश व्यवहारे यांना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, एका अल्पवयीन मुलाकडे चोरीची रिक्षा असून तो रोहन अभिलाशा सोसायटीजवळ, भावडी रोड, वाघोली, पुणे येथे सार्वजनिक रोडवर रिक्षासह थांबलेला आहे. खात्रीशीर माहिती मिळाल्याने लागलीच पोलिस उपनिरीक्षक सुरेश जायभाय यांनी सदर माहिती वपोनि रजनीश निर्मल यांना कळवले असता मिळाले बातमी प्रमाणे कारवाई करण्याचे आदेशित केल्याने युनिट ६ चे टिमने त्यास सापळा रचून ताब्यात घेतले. त्याचे ताब्यात 40,000/- रू किंमतीची बजाज कंपनीची रिक्षा नंबर MH 12 CT 7361 ही मिळून आली आहे. त्याची वैद्यकीय तपासणी केली असून सदर रिक्षाबाबत रिक्षाचालक सय्यद शेख रा. गणेशनगर, वाघोली यांनी लोणीकंद पोलिस ठाणे गुन्हा रजि नंबर- 672 /2023 भा दं वि क 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लोणीकंद पोलिस हे करीत आहेत.

सदरची कामगिरी रामनाथ पोकळे (अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे), अमोल झेंडे (पोलिस उप आयुक्त गुन्हे), सतीश गोवेकर (सहा.पोलिस आयुक्त सो गुन्हे 2) या वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल, पोलिस उप निरिक्षक सुरेश जायभाय, पोलिस अंमलदार ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार या पथकाने केली आहे.

पुणे-नगर महामार्गावरून गुन्हे शाखा युनिट ६ ने दोघांना ताब्यात घेतले अन्…

लोणीकंद पोलिसांनी ऍपल कंपनीचे मोबाईल फोन चोरीचा गुन्हा केला उघड…

I-Phone, I-Pad, Smart Watch चोरणाऱ्यांना युनिट -2 ने केले जेरबंद…

पुणे शहरात देशी गावठी कट्टा बाळगणारा अडकला पोलिसांच्या ताब्यात…

Video: पुणे शहरातील कोयता गॅंगच्या दहशतीचा व्हिडीओ व्हायरल…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!