भारतातून एक महिला प्रियकरासाठी सौदीला पळाली अन् आता…
औरंगाबाद : पाकिस्तानमधून भारतात आलेली सीमा हैदर आणि भारतातून पाकिस्तानमध्ये गेलेली अंजूचे प्रेम प्रकरण गाजत असताना आता औरंगाबादच्या आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. औरंगाबाद शहरातील एक महिला थेट सौदीला पळून गेल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे विदेशात गेल्यावर ती देशविघातक कृत्यात सहभागी झाल्याचा एक मेल औरंगाबाद पोलिसांना प्राप्त झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
औरंगाबाद शहरातील एका विवाहित महिलेची सोशल मीडियावरून परदेशी युवकासोबत ओळख झाली होती. पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. डिसेंबर महिन्यात ही महिला प्रियकराच्या मदतीने सौदीला पळून गेली. या प्रकरणी तिच्या पतीने पोलिस ठाण्यात नोंद केली. या काळात काही महिने ती सौदी अरेबिया व इतर देशांमध्ये राहिली. दरम्यान, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ती पुन्हा भारतात परतली. पण, औरंगाबादला पतीच्या घरी न जाता नाशिक जिल्ह्यातील माहेरी गेली. सध्या ती तेथेच राहत आहे.
औरंगाबाद पोलिसांना या महिलेबाबत 28 ऑगस्टला एक ई मेल प्राप्त झाला आहे. विदेशात गेल्यावर ही महिला देशविघातक कृत्यात सहभागी झाल्याचा उल्लेख मेलमध्ये करण्यात आला आहे. आता या सर्व प्रकरणाचा तपास एटीएसकडून सुरु असल्याचे कळत आहे.
सौदीत पळून गेल्यावर ही महिला देशविघातक कृत्य करत होती, असा आरोप मेलमध्ये करण्यात आला आहे. याची पोलिसांनी गंभीर दखल घेतली. पोलिसांनी लगेचच हे प्रकरण दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविले. तर एटीएसने कसून तपास सुरु केला आहे. हा ई-मेल नेमका कोणी पाठवला, त्याचा उद्देश काय? ती महिला प्रियकराला सोडून परत का आली?, ती खरेच प्रियकराकडे गेली होती का? यांसारखे अनेक प्रश्न निर्माण झाले असून, त्याचा तपास करत आहे.
दरम्यान, औरंगाबादची ही महिला थेट प्रियकराच्या मदतीने डिसेंबर महिन्यात सौदीला निघून गेली. काही दिवस तिथे राहिली. याच काळात ती आणखी काही देशात फिरल्याचा संशय आहे. मात्र, ती पुन्हा देशात परत आल्याने आणि पोलिसांना ई-मेल प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये परत आलेल्या या महिलेची पोलिसांसह एटीएसकडून कसून चौकशी केली जात आहे.
Video: पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिचा नवीन व्हिडिओ समोर…
पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर हिने गरोदरपणाबाबत केला खुलासा…
अंजूला मिळाले कोट्यावधींचे गिफ्ट अन् सुरक्षेला दोघे जण…
Video: अंजूने पाकिस्तानातून अरविंदला फोन करून केली शिवीगाळ…
परदेशी प्रेम! भारतीय वकीलाचे पाकिस्तानी महिलेसोबत ऑनलाईन लग्न…
रशियन महिला देवदर्शनाला आली अन् पडली भारतीय नागरिकाच्या प्रेमात…
श्रीलंकेतील महिलेचे फेसबुकवरून जुळले भारतीय युवकासोबत प्रेमसंबंध अन्…
प्रेम! भारतीय महिलेने प्रियकराला भेटण्यासाठी गाठले पाकिस्तान…
परदेशी प्रेम! बांग्लादेशी ‘जूली’ ‘सीमा’ ओलांडून भारतात आली अन् पुढे…