प्रेमात अडसर ठरत असल्याने चिमुकल्याचा खून करून मृतदेह अक्षरशः फेकला…

सोलापूर : प्रेमात अडसर ठरत असल्याने प्रियकरासोबत तिच्या आईनेच पोटच्या चार वर्षीय मुलाचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना मोडलिंब (ता. माढा) येथे घडली आहे. या घटनेमुळे संतापासह परिसरात खळबळ उडाली आहे.

मोडलिंब येथे राहणाऱ्या आई आणि तिच्या प्रियकराने प्रेमात अडथळा ठरणाऱ्या चार वर्षाच्या चुटक्या नावाच्या मुलाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह पुरंदर तालुक्यातील माळशिरस जवळील भुलेश्वर घाटात फेकून दिला. आई रेणू शंकर पवार व तिचा प्रियकर उमेश अरुण साळुंके अशी आरोपींचे नावे आहेत.

जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोडलिंब येथे राहणारे रेणू पवार आणि उमेश साळुंके यांच्यात प्रेम संबंध होते. या प्रेम संबंधात अडथळा ठरणाऱ्या चार वर्षाच्या चुटक्या या मुलाचा दोघांनी दीड महिन्यांपूर्वी गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर त्याचा मृतदेह साडीत गुंडाळला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी दुचाकी गाडीवर घेवून येवून तो पुरंदर तालुक्यातील भुलेश्वर घाटात फेकून दिला.

या बाबत रेणू पवार हिच्या चुलत बहिणीने पोलिस स्टेशन ला फिर्याद दिली. त्यानुसार जेजुरी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेवून घाटात फेकून दिलेल्या चिमुकल्याच्या मृतहेदाचे अवशेष शोधून काढले आहेत. दोघांवर जेजुरी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पोलिस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोज नवसरे तपास करीत आहेत.

माता न तू वैरिणी! मुलीला जिवंत जाळून मारलेस, तर तुला धनलाभ होईल…

माता न तू वैरिणी! अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा म्हणून चिमुकल्याचा खून…

धक्कादायक! प्रेम प्रकरणातून युवकाला जखमी अवस्थेतच फेकले विहिरीत अन्…

एकतर्फी प्रेमातून आत्महत्या; विसरु शकत नाही, तिने केवळ वापर केला…

प्रेमसंबंधातूनच अंजलीची हत्या; प्रियकराने तपासादरम्यान सांगितले…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!