महाराष्ट्र हादरला! शिक्षकाला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं…
वाशिम : एका शिक्षकाला अज्ञात आरोपींनी अडवून लोखंडी रॉडने जबर मारहाण करून जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना आज (सोमवार) मालेगाव तालुक्यातील कोल्ही बोर्डी रस्त्यावर घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मालेगाव तालुक्यातील बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेवर सुनील उर्फ दिलीप धोंडुजी सोनवणे हे शिक्षक म्हणून कार्यरत होते. आज सकाळी ते दुचाकीवरून शाळेत निघाले होते. […]
अधिक वाचा...पुणे शहर व पिंपरी-चिंचवड क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंना बक्षिस वितरण…
पुणेः 39 व्या पुणे शहर व पिंपरी-चिंचवड आयुक्तालय जिल्हा पोलिस क्रीडा स्पर्धा 2023-24 चे 4 ते 6 ऑक्टोबर या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेते खेळाडू व संघ यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे उप-कुलगुरु प्रो. डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास माजी पोलिस महासंचालक प्रविण दिक्षित, सह […]
अधिक वाचा...अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू; बलात्कार झाल्याचा आईचा आरोप…
मुंबईः भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिचा 26 मार्च 2023 रोजी संशायास्पद मृत्यू झाला होता. यानंतर पंजाबी गायक समर सिंह याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आकांक्षाने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्यासोबत बलात्कार झाल्याचा संशय आकांक्षाच्या आईने याचिकेत केला आहे. अभिनेत्री आकांक्षा दुबेचा संशायास्पद मृत्यू झाला आहे. सीबीआय तपासाची मागणी करणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी […]
अधिक वाचा...Video: क्रूरतेचा कळस! ‘हमासकडून युवतींचे अपहरण करून बलात्कार…
जेरुसलेम (इस्त्राईल): गाझा पट्टीतील हमास या दहशतवादी संघटनेने क्रूरतेचा कळस गाठला आहे. युवतींचे अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार केल्याच्या घटना समोर येत आहेत. यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. इस्रायलवर शनिवारी पहाटे 5000 रॉकेटने हल्ला केला असून, अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. सोशल मीडियावर हमासच्या क्रूर आणि अमानुष कृत्यांचे धक्कादायक व्हिडीओ आणि फोटो समोर येत […]
अधिक वाचा...भाऊ आणि वहिणीची हत्या करणारा चार तासात ताब्यात; हत्येचे कारण…
सातारा: आंधळी (ता. माण) गावात दाम्पत्याच्या हत्याकांड प्रकरणी दहिवडी पोलिसांनी फरारी आरोपीस अवघ्या चार तासात ताब्यात घेतले आहे. दादासो उर्फ बापूराव शहाजी पवार असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने आपला सख्खा चुलत भाऊ आणि वहिनीची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्याची माहिती चौकशीदरम्यान दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आरोपीच्या मुलीवर एक-दीड वर्षांपूर्वी अत्याचाराची घटना घडली होती. खून […]
अधिक वाचा...अभिनेता शाहरुख खानला सरकारने पुरवली Y+ स्कॉट सुरक्षा; कारण…
मुंबईः बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याला मिळालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने त्याच्या सुरक्षेत वाढ केली असून, Y+ स्कॉट सुरक्षा पुरवली आहे. शाहरुख खानला याआधी दोन पोलिस हवालदारांची सुरक्षा पुरवण्यात आली होती. त्याशिवाय त्याच्यासोबत स्वत:चा सुरक्षा रक्षकही असायचा. मात्र आता उच्चाधिकार समितीच्या शिफारशीनंतर शाहरुख खानची सुरक्षा Y+ स्कोअरवर अपग्रेड करण्यात आली आहे. शाहरुख खान आता राज्याच्या […]
अधिक वाचा...पोलिसकाकाची घराच्या अंगणात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या…
सोलापूर: एका सहाय्यक पोलिस निरीक्षकानं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आनंद मळाळे असे आत्महत्या केलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे. आनंद मळाळे हे सध्या नांदेड येथे सेवा बजावत होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजलेले नाही. पण, कामाचा ताण […]
अधिक वाचा...मुंबई पोलिसांच्या नावे बनावट फेसबुक प्रोफाईल अन् पैसे…
मुंबईः मुंबई पोलिसांच्या नावाने बनावट फेसबुक प्रोफाईल तयार करून पैसे मागितल्या प्रकरणी चौघांविरुद्ध वरळी पोलिसांकडून प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिस दलाचे उपायुक्त डॉ. राजू भुजबळ यांच्या नावाने बनावट फेसबुक प्रोफाईल तयार करून पैसे मागितल्याप्रकरणी वरळी पोलिसांनी केला गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत चौघांनी मिळून एकूण दोन लाख 55 हजार रुपये लोकांकडून उकळल्याची […]
अधिक वाचा...एक किलो सोनं खोदकामात सापडल्याचे सांगितले अन् पुढे…
वर्धा : बनावट दागिने दाखवून फसवणूक करणाऱ्या एकाला वर्धा पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत अटक केली असून, त्याच्याकडून दहा लाख रुपयेही जप्त केले. पोलिस दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी नईमुद्दीन काजी यांच्याकडे दोन व्यक्ती आल्या होत्या. त्यांनी काजी यांना सोन्याचा एक तुकडा दाखवला. सुमारे एक किलोचा हा तुकडा खोदकामात सापडल्याचे […]
अधिक वाचा...पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्याने विधवा महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी…
पुणे : सफाई कामगार असलेल्या विधवा महिलेकडे शरीर सुखाची मागणी करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे महापालिकेच्या आरोग्य निरीक्षक, ठेकेदारासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आरोग्य निरीक्षक मंगलदास माने, ठेकेदार शिवाजी सुळ, आणि संजय वाघमारे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत बिबवेवाडीतील एका ४० वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलिस […]
अधिक वाचा...
