
प्रेम! दोघे धायमोकलून रड-रड रडले अन् रेल्वेसमोर मारली उडी; एका क्षणात…
लखनौ (उत्तर प्रदेश): मुरादाबाद येथे प्रेमसंबंधातून युवक आणि युवतीने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांना उपस्थितांनी थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र त्यांनी कोणाचेही ऐकले नाही आणि रेल्वेसमोर उडी मारून जगाचा निरोप घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
मुरादाबादच्या बिलारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली घडली आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही एकमेकांचा हात घट्ट पकडून होते आणि रेल्वे जवळ येत असताना एकमेकांना मिठी मारून रडत होते. भरधाव वेगाने येणाऱ्या मालगाडीच्या लोको पायलटने त्यांना बाजूला होण्याचा इशारा दिला आणि अनेकवेळा हॉर्नही वाजवला, मात्र ते रुळावरून बाजूला झाले नाहीत. ट्रेनखाली आल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहाचे पाच तुकडे झाले होते.
मृत युवक सुशांत आणि आशी नावाची युवती हे दोघेही बिलारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सैफपूर जगन गावाचे रहिवासी होते. सुशांत मुरादाबादमध्ये एका फॅक्टरीत नोकरी करत होता आणि काही दिवसांपूर्वीच तो गावी आला होता. तर, आशी याच वर्षी १२वी पास झाली होती. गुरुवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास दोघेही घरात कोणालाही न सांगता मुरादाबाद-चंदौसी रेल्वे लाईनजवळ पोहोचले, जिथे त्यांनी एकत्र आत्महत्या केली.
मुरादाबाद पोलिसांनी सांगितले की, मृतांचे शरीर पाच तुकड्यांमध्ये आढळले असून, ते ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे. प्राथमिक तपासानुसार, हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसत आहे. शवविच्छेदन अहवालानंतर या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
प्रेमाचा त्रिकोण! गुजरातचा प्रियकर थेट पुण्यात आला अन्…
सोनमचे होते नोकरावर प्रेम अन् हनिमूनवेळी केला नवऱ्याचा गेम; पाहा टाईमलाईन…
प्रेमविवाह! मुख्याधापिकेने केला शिक्षक नवऱ्याचा खून; विद्यार्थ्यांना घेतले सोबत अन्…
धुळे हादरलं! जवानाला कॉलेजचं प्रेम पुन्हा घावलं अन् पत्नीला संपवलं…
प्रेम! मुलीसाठी शोधला जावई अन् जावयाला आवडली मुलीची आई…