पुणे! लग्नासाठी 2 विमानं बूक अन् केतन अग्रवालची खूनी निघाली होणारी बायको…
पुणे: लोणावळ्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावरून पडून व्यावसायिक केतन अग्रवाल (वय २४) या युवकाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. हा अपघात नसून एक पूर्वनियोजित कट रचून केलेली हत्या असल्याचे उघड झाले आहे. केतनच्या होणाऱ्या पत्नीनेच आपल्या मित्राच्या मदतीनं त्याला दरीत ढकलून दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! वरमाय-वरपित्यासह लग्न ठरलेल्या दुचाकीस्वार युगुलाचाही अपघाती मृत्यू…
जळगाव : अमळनेर-धुळे रस्त्यावरील मंगरूळ जवळ मंगळवारी (ता. ९) सकाळी ७ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण तिहेरी अपघाताने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातात वरमाय-वरपित्यासह लग्न ठरलेल्या दुचाकीस्वार युगुलाचाही मृत्यू झाला आहे. व्यारा (गुजरात) येथील सुरेश विक्रम महाजन आणि अनिता महाजन यांच्या मुलाचे येत्या १९ जून रोजी लग्न ठरले होते. त्यातच त्यांच्या भाच्याचा साखरपुडा अमळनेर […]
अधिक वाचा...लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांत तलाठ्याने घेतला गळफास; पत्नीचे प्रेमसंबंध…
बीड : लग्न होऊन अवघे १२ दिवस झाले असतानाच गणेश दत्तू कोळी या तलाठी युवकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई शहरालगतच्या मोरेवाडी परिसरात घडली होती. आता या प्रकरणी गणेशची आई सुनंदा दत्तू कोळी यांच्या फिर्यादीवरून पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीचे बाहेरील अनैतिक संबंध आणि मानसिक त्रासामुळेच गणेशने आत्महत्येचे […]
अधिक वाचा...लग्नासाठी कुटुंब कोल्हापुरात दाखल झाले अन् मिळाली धक्कादायक माहिती…
कोल्हापूर: फेसबुकवरील एका जाहिरातीला भुलून महाड (रायगड) येथील एका कुटुंबाला कोल्हापूर येथे आल्यानंतर मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याच्या नावाखाली या कुटुंबाकडून पैसे उकळून त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. महाड येथील एका युवकाने फेसबुकवर लग्नासंदर्भात जाहिरात पाहिली होती. त्यावरून त्याने संपर्क साधला असता, पूनम पाटील नावाच्या महिलेशी त्याचे बोलणे झाले. संबंधित […]
अधिक वाचा...स्मृती मानधनाचं मोडलं लग्न, पण तिनं एका वाक्यात जिंकली सर्वांची मनं…
नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न मोडले आहे. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लग्न मोडल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे. सांगली येथे स्मृती मानधना हिचे लग्न काही मिनिटांवर असताना वडिलांना हार्ट अटॅक आला होता, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. स्मृतीसाठी हा मोठा […]
अधिक वाचा...मुंबईच्या नवरदेवाच्या मानेत लग्न सुरु असतानाच बिहारमध्ये घातली गोळी…
पाटणा (बिहार): लग्न सोहळा सुरु असतानाच नवरदेवाच्या गळ्यात गोळी घालून ठार केल्याची भयंकर घटना घडली. मृत नवरदेव मुंबईत टेलर होता. तो लग्नासाठी बिहारमधील खगरियामध्ये गेला होता. मोहम्मद इर्शाद असे नवरेदवाचे नाव आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. इर्शादच्या भावाने सांगितले, विवाहसोहळ्यादरम्यान एक मुलगा आला आणि नवरदेवाच्या शेजारी असलेल्या खुर्चीवर बसला. […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! नवरदेवाने घातला नवरीला हार अन् आला हृदयविकाराचा झटका…
अमरावती: अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील पुसला या गावात लग्नसोहळ्यात घडलेल्या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. आनंदाच्या वातावरणात सुरू झालेला विवाहसोहळा क्षणभरात शोकांतिका ठरला. कोतवाल म्हणून शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अमोल गोड यांच्या विवाहाची लगबग गावात सुरू होती. घरात सनई–चौघडे गुंजत होते, नवरी वधूवस्त्रात सजून बसली होती आणि नवरदेव अमोल यांची वरातही आनंदात कार्यालयाच्या […]
अधिक वाचा...सोनमचे होते नोकरावर प्रेम अन् हनिमूनवेळी केला नवऱ्याचा गेम; पाहा टाईमलाईन…
भोपाळ (मध्य प्रदेश) : सोनम हिने हनिमूनसाठी गेल्यानंतर राजा रघुवंशी यांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी एकूण पाच आरोपींना अटक केली आहे. राजाचा मृतदेह २ तारखेला पोलिसांना सापडला होता. तर सोनम आज (सोमवार) पोलिसांना शरण आली. लग्नाआधीच्या प्रियकरासोबत सोनमला राहायचे होते. परंतु घरच्यांच्या इच्छेखातर तिने राजासोबत लग्न केले होते. त्यामुळे ती फारशी […]
अधिक वाचा...राजा आणि सोनम रघुवंशी हनिमून प्रकरणी धक्कादायक खुलासा; सोनमला अटक…
भोपाळ (मध्य प्रदेश): इंदूरचे राजा आणि सोनम रघुवंशी हे जोडपे मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेले असताना बेपत्ता झाले होते. या प्रकरणाला आता नाट्यमय वळण लागले आहे. राजा रघुवंशी यांचा मृतदेह मेघालयमधील एका दरीत 2 जून 2025 रोजी सापडला होता. बेपत्ता असलेली सोनम आता उत्तर प्रदेशात सापडली आहे. त्यावेळी तिने हत्येची कबुली दिली. शिलाँगहून बेपत्ता झालेली सोनम आता […]
अधिक वाचा...नवरदेवासमोरच नवरीने तीन मुलांच्या बापासोबत काढला पळ…
लखनौ (उत्तर प्रदेश): विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर नवरी सासरी निघाली होती. मात्र, युवकाने रस्त्यातच वाहन थांबवले आणि नवरदेवासमोरच नवरीला घेऊन पळून गेल्याची घटना गाझीपूरच्या बिरनो पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. या घटनेमुळे नवरदेव आणि वऱ्हाडींना मोकळ्या हाताने परतावे लागले आहे. नवरदेव ब्रिजेश कुमार आपल्या पत्नीला घेऊन जात होता. दुचाकीवरून आलेल्या एका युवकाने रस्त्यातच […]
अधिक वाचा...
