‘डॉन’च्या आलिशान बंगल्यावर धाड अन् मिळालं मोठं घबाड…

छत्रपती संभाजीनगर : एका तथाकथित ‘डॉन’च्या आलिशान बंगल्यावर पोलिस गुन्हे शाखेने पहाटेच्या सुमारास अचानक छापा टाकला. गुन्हे शाखेने बंगल्यात प्रवेश करताच संपूर्ण घराची झाडाझडती सुरू केली. या तपासणीदरम्यान पोलिसांच्या हाती घबाड लागलं आहे. पडेगाव परिसरात सुरू असलेल्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण गुन्हेगारी जगतात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटेच्या सुमारास पडेगाव येथील या आलिशान बंगल्याला चारी बाजूंनी वेढा घातला आणि अचानक धाड टाकली. ही कारवाई अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. खबरदारीचा उपाय म्हणून पडेगाव परिसरामध्ये प्रचंड मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणत्याही अनुचित प्रकार टाळण्यासाठी स्थानिक पोलिसांची जादा कुमकही घटनास्थळी मागवण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

गुन्हे शाखेने बंगल्यात प्रवेश करताच संपूर्ण घराची झाडाझडती सुरू केली. या तपासणीदरम्यान पोलिसांच्या हाती घबाड लागलं असून प्राथमिक माहितीनुसार, तब्बल साडेपाच कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर असलेली रोकड हाती लागल्याने ती मोजण्यासाठी पोलिसांना तब्बल पाच नोटा मोजण्याची यंत्रे मागवावी लागली. रोकड व्यतिरिक्त बंगल्यातून मोठ्या प्रमाणावर सोने-चांदीचे दागिने आणि अनेक महत्त्वाची संशयास्पद कागदपत्रे पोलिसांना मिळाली असून ती जप्त करण्यात आली आहेत. सध्या कथित डॉनचे सर्व आर्थिक व्यवहार, बँक खाती आणि मालमत्तेशी संबंधित बेनामी कागदपत्रांची कसून तपासणी पोलिसांकडून केली जात आहे.

दरम्यान, ९०च्या दशकातील या जुन्या डॉनवर अचानक एवढी मोठी धाड का टाकण्यात आली? यामागे एखादे मोठे आर्थिक रॅकेट आहे की खंडणी, जमीन बळकावणे यांसारख्या जुन्या गुन्ह्यांचे धागेदोरे आहेत? याबाबत अद्याप गूढ कायम आहे. या संपूर्ण कारवाईबाबत गुन्हे शाखेकडून पत्रकार परिषद घेऊन अधिकृत माहिती जाहीर केली जाणार आहे. त्यानंतरच या मोठ्या धाडीमागील नेमके कारण, जप्त केलेली अचूक मालमत्ता आणि पुढील कारवाईचा तपशील स्पष्ट होईल. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड; मिळालं भलं मोठं घबाड…

नाशिक! कॅप्टन अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; घबाडंच हाती…

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील लाचखोर उपनिरीक्षकाच्या घरात मिळालं घबाड…

पोलिसांनी 102 क्रमांकाची खोली उघडली अन् मिळालं मोठं घबाड…

निवृत्त कॉन्स्टेबलच्या घरावर छापा टाकला अन् मिळालं मोठं घबाड…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!