Video: पोलिस अधिकाऱ्याची राष्ट्रध्वजाला दिलेली सलामी ठरली अखेरची…
धाराशिव: उमरगा तालुक्यातील तलमोड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजाला सलामी दिल्यानंतर पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. मोहन भीमा जाधव (वय ५५) असे मृत पावलेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मोहन जाधव हे तलमोड येथील चेक पोस्टवर एक्साईज इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी चेक पोस्टवर ध्वजारोहण केले आणि […]
अधिक वाचा...पुणे! विवाहित प्रेयसीला गावी फिरायला जाऊ म्हणून कारमध्ये बसवले अन्…
पुणे: धाराशिव येथे एका विवाहित प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनिकेत महादेव कांबळे (वय 33) याने राणी गायकवाड (वय 26) हिचा गळा दाबून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. राणी सतत अनिकेतसोबत राहण्याचा आणि लग्न करण्याचा आग्रह धरत असल्याने कंटाळून त्याने हा कट आखला […]
अधिक वाचा...सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू…
धाराशिव: सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव येथे आज (शनिवार) गाडीचे टायर्स फुटल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, क्रुझर गाडी सोलापूर-हैदराबाद महामार्गावरुन आज सकाळी जात होती. या गाडीतील प्रवासी सोलापूरवरुन नळदुर्ग येथे देवदर्शनासाठी निघाले होते. धाराशिवमधील अणदूर परिसरात […]
अधिक वाचा...हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचे 5 जणांकडून अपहरण, बेदम मारहाण…
धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचे अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हॉटेल भाग्यश्री गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्धीच्या झोतात आहे. अपहरणाचा धक्कादायक प्रकार बुधवारी (ता. २३) सायंकाळी घडला आहे. अज्ञात कारमधून आलेल्या ४ ते ५ आरोपींनी हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचे अपहरण केले आणि त्यांना बेदम मारहाण केली. यादरम्यान मारहाण झाल्यामुळे हॉटेल मालकावर जिल्हा रुग्णालयात उपचार […]
अधिक वाचा...पोलिसांनीच केला धूम ठोकलेल्या पोलिस अधिकाऱ्याचा सिनेस्टाईल पाठलाग…
धाराशिव : आनंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनीच पोलिसाचा सिनेस्टाईल पाठलाग करून एका गुन्ह्यात अटक केली. आरोपी पोलिस पळून जाताना आणि त्याला पकडतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. लाच देणारा पोलिस, लाच घेणारा पोलिस, पकडणारा पोलिस, पळवून लावणारा पोलिस असा विचित्र प्रकार बघायला मिळाल्याने परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे […]
अधिक वाचा...धक्कादायक! गावातील युवतीसोबत प्रेमविवाह अन् ऑनलाईन रम्मीचा लागला नाद…
धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात एका व्यक्तीने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. पण, त्याने आत्महत्या करण्यापूर्वी स्वत:ची पत्नी आणि दोन वर्षांच्या चिमुकल्यालाही ठार मारल्याची धक्कादायक घटना बावी गावात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. लक्ष्मण मारुती जाधव (वय 29) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. लक्ष्मण मारुती जाधव याला पत्ते खेळण्याचा नाद होता. तो ऑनलाईन […]
अधिक वाचा...पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या श्रीमुखात लगावली पैलवानाने…
धाराशिव: भूम तालुक्यातील आंदरूड गावात यात्रेनिमित्त भरवलेल्या कुस्ती स्पर्धेत पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या एका पैलवानाने श्रीमुखात लगावल्याची घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. निलेश घायवळ याला मारहाण केल्यानंतर हा पैलवान घटनास्थळावरुन फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आंदरूड येथील ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त ही स्पर्धा भरवण्यात […]
अधिक वाचा...हृदयद्रावक Video! महाविद्यालयाच्या निरोप समारंभात हसवलं अन् बोलता-बोलता कोसळली…
धाराशिव : महाविद्यालयाच्या निरोप समारंभात भाषण करत असतानाच चक्कर येऊन पडल्यानंतर विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना धाराशिवमध्ये घडली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. वर्षा खरात असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेचा व्हिडिओ काही वेळातच सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. काही क्षण आधी स्टेजवर बोलत असलेली वर्षा हसत हसतच खाली पडली अन् […]
अधिक वाचा...चालकासोबत मालकीणीचं प्रेमसंबंध; महिलेच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट…
धाराशिव: धाराशीव जिल्ह्यातील कळंब येथे मनीषा बिडवे (वय 39) या महिलेचा राहत्या घरात लोखंडी हातोडीने मारून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हत्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. ही हत्या नेमकी कुणी आणि कशासाठी केली, याची माहिती समोर आली आहे. मनीषा बिडवे यांचे घर बाहेरून कुलूपबंद असल्याचे दिसले. घराच्या परिसरात […]
अधिक वाचा...तुळजापूरजवळ पुलाखाली एक महिला आणि दोन पुरुषांचे आढळले मृतदेह…
धाराशिव : एका पुलाखाली ३ मृतदेह आढळून आले असून, यामध्ये १ महिला आणि २ पुरुषांच्या मृतदेहाचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील बाभळगावमध्ये ही घटना समोर आली आहे. सोलापूर हैदराबाद महामार्ग क्रमांक 65 वर बाबळगाव गावाजवळ ही घटना घडली आहे. पुलाखाली ३ मृतदेह आढळून आले. […]
अधिक वाचा...
