दिल्ली पोलिसांकडून महिला कार्यकर्त्यांशी असभ्य वर्तन; Video Viral…

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या (CJP) ‘संसद चलो’ मोर्चदरम्यान (२०-२१ जुलै, २०२६) वातावरण चांगलेच तापले आहे. या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर, विशेषतः महिला आणि विद्यार्थ्यांवर, मोठ्या प्रमाणावर बलप्रयोग करण्यात आल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सीजेपी (CJP) च्या नेतृत्वाने दिलेल्या माहितीनुसार, जंतरमंतरवर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या महिला आणि विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अचानक मारहाण आणि लाठीचार्ज केला. महिला कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की, पोलिसांकडून त्यांच्याशी अत्यंत गैरवर्तन करण्यात आले, केस खेचण्यात आले, कपडे फाडण्यात आले आणि त्यांना जबरदस्तीने बसमध्ये ढकलण्यात आले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)


सोशल मीडियावर एका व्हिडीओमध्ये एका युवकाने दावा केला आहे की, तो स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होता. त्याने रेकॉर्ड केलेल्या फुटेजमध्ये एका पोलिसाने आंदोलक युवतीला अयोग्य पद्धतीने स्पर्श (बॅड टच) केल्याचे आणि त्यानंतर इतर त्याच्यासोबतच्या कर्मचाऱ्यांसोबत हसल्याचे दिसून येत असल्याचा दावा या तरुणाने केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर इंटरनेटवर सुरक्षेच्या मुद्द्यावरून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे, दिल्ली पोलिसांनी आपल्यावरील सर्व गंभीर आरोप आणि महिलांशी गैरवर्तन केल्याचे दावे “पूर्णपणे पूर्णतः खोटे आणि दिशाभूल करणारे” असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ravi Pratap (@emgeenear)

दिपकेंचा गंभीर आरोप…
दिल्ली पोलिसांनी सोमवारी संसदेवर काढण्यात आलेल्या मोर्चातील तरुण आणि तरुणींना अमानुषपणे मारले. दिल्ली पोलिसांनी 12 वर्षांच्या मुलीचं डोकं फोडलं, 15-16 वर्षांच्या मुलींचे गळे पकडले होते. मी एका मुलीला पोलिसांनी मारताना स्वत: बघितले आहे. या मुलीचे कपडे पोलिसांनी फाडले आणि तिला छातीवर पाय देऊन मारले. एका मुलीच्या गळ्यावर पोलिसांनी काठीचे फटके मारले आहेत. त्यामुळे ही तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दिल्ली पोलिसांना आंदोलनातील विद्यार्थ्यांचे खून करायचे आदेश देण्यात आले होते का? धर्मेंद्र प्रधान यांना वाचवण्यासाठी नरेंद्र मोदी यांना आणखी मुलांचे खून करायचे आहेत का, असा सवाल कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केला आहे.

महिला IPSचे अश्लील Video काढून पतीला पाठवल्याचा गंभीर आरोप अन् आत्महत्येचा प्रयत्न…

सॉफ्टवेअर इंजिनीअर युवती निर्वस्त्र अवस्थेत गेली मंदिरात अन्…

पुणे! घायवळ टोळीकडून कोयत्याने वार, हल्ल्याचा सूत्रधाराला मुंबईतून केली अटक…

महाराष्ट्रातील सुपुत्र अखेरच्या प्रयत्नात झाला IPS अन् दिला राजीनामा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!